तीन देशांच्या लॅटिन अमेरिका दौऱ्यामुळे ‘उच्च स्तरीय संबंधांची दरी’ सांधली गेली – उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू

0
1055
The Vice President, Shri M. Venkaiah Naidu at the historical Pachacamac Archeological site, in Lima, Peru on May 12, 2018. The The Minister of State for Tribal Affairs, Shri Jaswantsinh Sumanbhai Bhabhor, the Members of Parliament and other dignitaries are also seen.

​​

पाच करारांवर स्वाक्षऱ्या

गोवा खबर:तीन लॅटिन अमेरिका देशांच्या दौऱ्यामुळे महत्वाच्या प्रांताबरोबर ‘उच्च संबंधांची दरी’ सांधण्यास मदत झाली तसेच परस्पर हितासाठी द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक सुधारण्यास यामुळे मदत होईल असे उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. ग्वाटेमाला, पनामा आणि पेरु या तीन देशांचा दौरा आटोपून मायदेशी परतण्यापूर्वी ते फ्रँकफर्ट इथे बातमीदारांशी बोलत होते.

भारतीय नेत्यांचे उच्चस्तरीय दौरे परस्पर हितासाठी सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या सकारात्मक इच्छेचे द्योतक आहे. गेल्या चार वर्षात भारताकडून अशा प्रकारचे अनेक दौरे करण्यात आले. हा दौरा त्याचाच एक भाग आहे, असे ते म्हणाले.

अमेरिका आणि उत्तर व दक्षिण अमेरिकी अर्थव्यवस्थांबरोबर लॅटिन अमेरिकी देशांचे उच्चस्तरीय संबंध असल्यामुळे भारताला अनेक संधी उपलब्ध असल्याचे नायडू म्हणाले.

या दौऱ्यात पाच करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ग्वाटेमालाच्या राजदूत आणि इंग्रजी शिक्षकांना प्रशिक्षण, भारत आणि पनामाच्या राजनैतिक, अधिकृत आणि दूतावास पारपत्र धारकांना व्हिसातून सूट आणि पेरु बरोबर कृषी संशोधन आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा सहकार्याबाबत कृती आराखड्याचा यात समावेश आहे.

पनामामध्ये जैवविविधता आणि अंमली पदार्थ विरोधी केंद्र तसेच नाविन्यपूर्ण संशोधन आणि तंत्रज्ञान केंद्र उभारण्यासाठी नायडू यांनी 25दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे कर्ज जाहीर केले.