तिसऱ्या लाटेला तोंड देण्यास सरकार सज्ज : मुख्यमंत्री

0
159

गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्य सरकारने कोविड १९ च्या साथीच्या रोगाच्या तिसर्‍या लाटेला तोंड देण्यासाठी पुरेशी पावले उचलून पूर्णपणे तयारी केली असल्याचे सांगितले.

गोवा वैध्यकिय महाविध्यालय आणि हॉस्पिटलाच्या नवीन सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये १०० नवीन बेड व आवश्यक उपकरणे उभारली असून त्याच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मुख्यमंत्र्यानी राज्यातील कोविड-१९ च्या महामारीच्या काळात राज्य सरकारच्या प्रयत्नाना हातभार लावलेल्या कोर्पोरेट्सच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. ते म्हणाले अनेक कॉर्पोरेट्सनी गोवा आणि देशभरात मदत केली आहे आणि त्यात वेदांतचा समावेश आहे.

कार्यक्रमास आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, आमदार आंतोनियो फर्नांडिसचे, आमदार फ्रान्सिस्को सिल्व्हेरा, वेदांत लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौविक मझुमदार, जीएमसीचे डीन डॉं बांदेकर, संदीप जैन, वेदांतचे उप-मुख्य कार्यकारी अधिकारी सुजत शाह उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी पुढे बोलताना वेदांतने कोरोना संसर्गा विरूद्ध लढा देण्यासाठी सुमारे १० कोटी रुपये खर्च केले असल्याची माहिती दिली. या संसर्गामुळे अनेक मौल्यवान प्राण गमावल्याचे त्यानी सांगितले. १० कोटी रुपयांव्यतिरीक्त वेदान्ताने ३ टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) दैनंदिन तत्वावर पुरविले आहे. मुख्यमंत्र्यानी कोविड १९ च्या तिसर्‍या लाटेला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकारने टास्क फोर्स आणि राज्य कार्यकारी समितीची स्थापना केली असल्याचे सांगितले.

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आपल्या भाषणात आजकाल प्रत्येकजण तिसऱ्या लाटेच्या संभाव्यतेबद्दल बोलत आहे असे सांगितले आणि त्याचा मुलांवर परिणाम होणार याची बर्‍याच लोकांना माहिती आहे ही बाब लक्षात घेऊन सरकारने जीएमसीमध्ये नवीन सुपर स्पेशालिटी ब्लॉक सुरू केला असून तिसर्‍या लाटेच्या तयारीसाठी अवलंबिल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी बैठका घेण्यात आल्याचे सांगितले.