तिरंदाज गोहेला बोरो हिच्या वैद्यकीय उपचारांसाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर

0
3357

गोवा खबर:राष्ट्रीय पातळीवरील तिरंदाज गोहेला बोरो हिच्या वैद्यकीय उपचारांसाठी केंद्रीय क्रीडा आणि युवक व्यवहार राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. पंडीत दीनदयाल उपाध्याय राष्ट्रीय क्रीडापटू कल्याण निधीअंतर्गत ही मदत देण्यात आली आहे.

याआधी देखील जानेवारी महिन्यात तिला 3.37 लाख रुपयांची मदत करण्यात आली होती.

गोहेला बोरो हिला सिस्टेमिक लम्प एरेथेमाथोस आजार झाला असून, त्याशिवाय इतर आजारांचाही ती सामना करत आहे. कोक्राझार इथल्या आमगुरी गावात राहणाऱ्या गोहेलाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे.