तियात्रावरील जीएसटी रद्दसाठी शिवसेनेचे पंतप्रधानांना साकडे

0
956

गोवा:गोव्याची पारंपरिक कला असलेल्या तियात्र आणि नाटकांना जीएसटी मधून वगळावे अशी मागणी गोवा शिवसेनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे केली आहे.शिवसेनेच्या उपाध्यक्ष राखी नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नाईक म्हणाल्या तियात्र जीएसटी मधून वगळावे अशी मागणी सर्वप्रथम शिवसेनेने केली होती.त्यानंतर राज्यातील सताधारी आघाडी मधील गोवा फॉरवर्ड पक्षाला जाग आली,अशी टिप्पणी नाईक यांनी केली.
तियात्रावर जीएसटी आकरणे योग्य ठरणार नाही अशी भूमिका खरे तर मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी जीएसटी परिषदेत मांडणे गरजेचे होते मात्र डोळे असून देखील मुख्यमंत्री धुतराष्ट्रासारखे वागत आहेत.गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई हे विदुराची भूमिका निभावत असून त्यांनी सांगितल्या नंतर मुख्यमंत्र्यांचे डोळे उघडतात.मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच शिवसेनेला हा विषय उपस्थित करावा लागल्याचे नाईक म्हणाल्या.
शिवसेना हा प्रश्न धसास लागेपर्यंत त्याचा पाठपूरावा करणार असल्याचे प्रवक्ते जितेश कामत यांनी सांगितले.शिवसेनेचे गोवा प्रभारी खासदार संजय राऊत यांच्या मार्फत केंद्र सरकारकडे वरिष्ठ पातळीवर या विषयाचा पाठपुरावा करणार असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.