तरुण आणि प्रतिभावान सौंदर्यवती यामाहा फॅसिनो मिस दिवा – मिस युनिव्हर्स इंडिया 2018 च्या मध्ये मुकूटाच्या आणखीन जवळ पोहोचल्या

0
1341

 

 

यामहा फॅसिनो मिस दिवा 2018 ची विजेती मिस युनिव्हर्स मध्ये अभिमानाने भारताचे प्रतिनिधित्व करेल. विजेत्या सौंदर्यवतीला 10 लाख रु ची बक्षिसे जिंकण्याची देखील संधी

 

 

गोवा खबर:आपल्या नव्या सत्राच्या लॉन्चसह सेंट्रलने स्टाइल केलेल्या यामाहा फॅसिनो मिस दिवा युनिव्हर्स इंडिया 2018ची उत्कंठा आणि त्याचे ग्लॅमर वाढले आहे. यातील विजेती स्पर्धक मिस युनिव्हर्स या प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करेल.

 

भारतातील सौंदर्य आणि प्रतिभा जागतिक सौंदर्याच्या मंचावर आणण्यासाठी सहयोग देताना या स्पर्धेतील मार्गदर्शक लारा दत्ता आता अशा सर्वश्रेष्ठ सौंदर्यवतीला शोधण्याची जबाबदारी पेलेल, जी मस्ती, धाडस, विनोद, खेळकरपणा, चैतन्य, मादकता, आरोग्य, सहृदयता आणि मोहकता यांची नवीन व्याख्या करेल.

 

जून महिन्यात देशभरात याच्या ऑडिशन सुरू झाल्या ज्यामध्ये विजेत्या स्पर्धकाला मिस युनिव्हर्सचे तिकीट पटकवण्याची अभूतपूर्व संधी देण्यात आली होती. लखनौ, कोलकाता, इंदूर, हैदराबाद, पुणे, अहमदाबाद, बंगळूर, चंदिगड आणि दिल्ली यांसारख्या देशातील 10 शहरांतून झालेल्या या ऑडिशन्सचा समारोप मुंबई येथे गेल्या आठवड्यात झाला, ज्यात या प्रतिष्ठित मुकुटासाठी स्पर्धा करण्यासाठी सर्वोत्कृष्ट 20 स्पर्धकांची नावे घोषित करण्यात आली.

 

या सर्वोत्कृष्ट 20 स्पर्धकांना या उद्योगातील मातब्बर व्यक्तींकडून कठोर प्रशिक्षण देण्यात येईल व त्यांचे ग्रूमिंग करण्यात येईल. ह्या स्पर्धक मुली चार शहरांमध्ये होणार्‍या उप-स्पर्धेत भाग घेतील व सरते शेवटी नवीन फॉरमॅटच्या एका थीम असलेल्या रात्री मुकुट प्राप्त करण्यासाठी स्पर्धा करतील.

 

यापैकी पहिली उप स्पर्धा गोवा येथे पार्क कलंगुट मुक्कामी सुरू झाली. यानंतर दिल्ली, चेन्नई आणि मुंबईत स्पर्धा होईल व त्यामध्ये या मुलींमधील विजय मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांची तपासणी करण्यात येईल.

 

या समारंभात पार्क कलंगुट, गोवा येथे दिनो मोरीया, मंदाना करिमी आणि मार्गदर्शक व माजी मिस युनिव्हर्स लारा दत्ता यांनी समारंभाची शोभा वाढवली.

लाराने पाहुण्यांचे स्वागत केले आणि नवीन फॉरमॅटची माहिती दिली. तिने हे सांगितले की, या नवीन फॉरमॅटमध्ये सौंदर्यवती कशी घडते हे लोकांना पाहता येईल. मिस युनिव्हर्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार्‍या यंदाच्या विजेती स्पर्धकात आपण कोणते गुण पाहणार आहोत, हे तिने सांगितले.

 

स्पर्धक मुलींची पारख मिस बॉडी ब्युटिफुल, मिस रॅम्प वॉक, मिस ब्युटिफुल आय आणि मिस लाइफस्टाईल या निकषांवर करण्यात आली. अनुष्का मनचंदाने आपल्या गाण्याने लोकांचे मनोरंजन केले.

 

गोवा उप-स्पर्धेसाठी नेमलेल्या फॅशनेबल परीक्षकांच्या पॅनलमध्ये सामील होते:

 

 • लारा दत्ता:- एक भारतीय अभिनेत्री, मॉडेल आणि सौंदर्य सम्राज्ञी, जिने मिस इंटरकॉन्टिनेन्टल 1997 आणि मिस युनिव्हर्स 2000 हे मुकुट जिंकले आहेत. मिस युनिव्हर्स होणारी ती दुसरी भारतीय स्त्री होती. आणि त्यांनंतर कोणत्याही भारतीय सौन्दर्यवतीने हा मुकुट जिंकलेला नाही.
 • दिनो मोरीया:– राज आणि फाइट क्लब यांसारख्या चित्रपटातून झळकलेला भारतीय अभिनेता आणि माजी सुपर मोडेल.
 • मंदाना करिमी:- इराणी-भारतीय मूळ असलेली भारतीय अभिनेत्री. जगभरात अनेक मॉडेलिंग प्रोजेक्टसवर यशस्वीरित्या काम केल्यानंतर कया कूल है हम 3 आणि भाग जॉनी यांसारख्या बॉलीवूड चित्रपटात प्रमुख भूमिका केली.

 

या सौंदर्यवतींचा रोमांचक प्रवास बघा 30 ऑगस्ट रोजी रात्री 7 वाजता आणि फिनालेचे काही समयांतराने होणारे जिवंत प्रसारण बघा 31 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता कलर्स इन्फिनिटीवर, जी भारताची प्रिमियर इंग्रजी मनोरंजन वाहिनी आहे.

31 ऑगस्ट रोजी NSCI येथे सायंकाळी 6 वाजल्यानंतर सोनाक्षी सिन्हा आणि टायगर श्रोफ यांचे दमदार परफॉर्मन्स पाहण्यासाठी बुक माय शो वरून तिकीट खरेदी करा.

 

पार्टनर आणि प्रायोजक यांची श्रेयनामावली:

पार्टनर आणि प्रायोजक यांची श्रेय नामावली:

 

 • शीर्षक प्रयोजक: यामाहा फॅसिनो
 • स्टाइल: सेंट्रल
 • यांच्याशी भागीदारी: कलर्स इन्फिनिटी
 • स्कीन केअर एक्स्पर्ट: डॉ. त्वचा
 • कॉस्मेटिक पार्टनर: डॅझलर ईटर्ना
 • सलोन पार्टनर: ग्लॅम स्टुडिओज
 • व्हिजन पार्टनर: कोडॅक लेन्स
 • स्माइल केअर पार्टनर: डॉ. कथूरियाज डेंटिस्ट्री
 • रेडिओ पार्टनर: रेडिओ मिरची
 • मल्टिप्लेक्स पार्टनर: कार्निव्हल सिनेमाज
 • शो दिग्दर्शक: लुबना अॅडम
 • स्विमवेअरसाठी डिझाइनर: निधी मुनीम
 • रिसॉर्ट वेअरसाठी डिझाइनर: शिवन आणि नरेश
 • सौन्दर्यस्पर्धेचे स्टायलिस्ट: एशा अमलीन
 • इन-हाऊस स्टायलिस्ट: भरत गुप्ता आणि शीफा गिलानी
 • केस आणि मेकअप डिझाइनर: बियांका लोझादो
 • शीतपेये पार्टनर: ब्लेंडर्स प्राइड आणि किंगफिशर प्रीमियम बियर्स
 • हॉस्पिटॅलिटी पार्टनर: रिसॉर्ट रिओ, गोवा
 • व्हेन्यू पार्टनर: द पार्क कलंगुट, गोवा
 • क्रिएटिव्ह कंसल्टेशन: सिनेयुग
 • इव्हेंट प्रॉडक्शन: बुल्सआय एंटरटेन्मेन्ट
 • अधिक माहितीसाठी www.missdiva.com वर लॉगऑन करा

फेसबुकवर मिस दिवाला लाइक करा: https://www.facebook.com/officialmissdiva/
ट्विटरवर मिस दिवाला फॉलो करा: https://twitter.com/MissDivaOrg
इन्स्टाग्रामवर मिस दिवाला फॉलो करा: https://www.instagram.com/missdivaorg/
मिस दिवा बघा येथे-#ThisIsMIssDiva

 

 

मिस इंडिया संस्थेबद्दल:
मिस इंडिया ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि स्वप्ने साकार करणारी ग्लॅमरस सौन्दर्यस्पर्धा आहे. जागतिक मंचावर भारताच्या पुढील प्रतिनिधीला पाहण्यासाठी संपूर्ण जगभरातील लाखो लोक उत्सुक असतात. हा अशा एका परिपूर्ण सुंदरीचा शोध आहे जिच्यात सौंदर्य, समतोल, लावण्य आणि प्रतिभा असेल आणि जी मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करू शकेल. हा असा मंच आहे ज्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशासाठी खूप प्रशंसा मिळवली आहे. ऐश्वर्या राय, सुश्मिता सेन, लारा दत्ता, प्रियंका चोप्रा, दीया मिर्झा, इ. माजी विजेत्या लावण्यवतींनी आंतरराष्ट्रीय वर्तुळात भारताची मान उंचावली आहे.

 

यामाहा मोटर्स बद्दल:

 

यामाहा मोटरने एका संयुक्त उपक्रमाच्या रूपात 1985 मध्ये भारतात आगमन केले. ऑगस्ट 2001 मध्ये ती जपानच्या यामाहा मोटर कंपनी लि. (YMC) ची 100% शाखा बनली. 2008 मध्ये मित्सुई अँड कं. लि. ने YMC शी करार करून ती इंडिया यामाहा मोटर प्रायव्हेट लिमिटेड (IYM) मध्ये संयुक्त गुंतवणूकदार बनली.सध्या,IYM आपल्या पुढील प्रमाणे नानाविध दुचाकींचे मार्केटिंग आणि विक्री करत आहे: स्पोर्ट्स मॉडेल YZF-R3 (321 सीसी),YZF-R15 S (149 सीसी); ब्लू-कोर टेक्नॉलॉजी सक्षम मॉडेल्स जशी की,FZ 25 (249 सीसी), फॅझर 25 (249 सीसी),FZ-S FI (फ्यूएल-इंजेक्टेड, 149 सीसी),फॅझर FI (फ्यूएल-इंजेक्टेड, 149 सीसी),SZ-RR व्हर्जन 2.0 (149 सीसी), सॅल्यूटो (125 सीसी), सॅल्यूटो RX (110 सीसी),सिग्नस रे-ZR (113 सीसी), फॅसिनो (113 सीसी), सिग्नस अल्फा (113 सीसी),सिग्नस रे Z (113 सीसी); अगदी नवीन सुपरबाइक MT-09 (847 सीसी) आणि YZF-R1 (998 सीसी).

 

सेंट्रल बद्दल:

 

फ्यूचर लाइफस्टाईल फॅशन्सचा एक मुख्य रिटेल फॉरमॅट असलेले सेंट्रल ही भारतातील मेट्रो शहरात आणि मोठ्या शहरांतील केंद्रीय भागात असलेल्या फॅशन डिपार्टमेंटल स्टोर्सची एक शृंखला आहे. सेंट्रलची दुकाने 60,000 चौरस फुट ते 230,000 चौ. फुट क्षेत्रफळाइतकी अवाढव्य असतात आणि मेन्स वेअर, कॅज्युअल वेअर,एथनिक वेअर, विमेन्स वेअर, किड्स वेअर, फूटवेअर, अॅक्सेसरीज, होम प्रॉडक्ट्स, हेल्थ आणि ब्युटी यांसारख्या सर्व श्रेणींमधील 500 पेक्षा जास्त देशी आणि विदेशी ब्रॅंड्स त्यात उपलब्ध असतात. ही दुकाने अनेकदा इतर दुकानांपासून स्वतंत्र इमारतीत असतात व त्यामध्ये फूडकोर्ट, रेस्टोरंट, सुपर मार्केट आणि इलेक्ट्रॉनिक सुपरस्टोर्स असतात. सेंट्रल स्टोर्स मुंबई, बंगळूर, हैदराबाद, कोलकाता, पुणे, अहमदाबाद आणि गुडगाव सारख्या मोठ्या शहरांत तसेच गुवाहाटी, बडोदे, इंदूर, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, पटना आणि सुरतेसारख्या लहान शहरांत आहेत. सध्या भारतभरात 25 शहरांमध्ये मिळून एकूण 40 सेंट्रल स्टोर्स आहेत जी 3 मिलियन चौ. फुट क्षेत्रफळावर कार्यरत आहेत.