ढवळीकरांनी मंदीरांच्या आडून लोकांमध्ये फुट पाडली: गावडे

0
921
शिरोडा: शिरोडयाचे भाजपचे उमेदवार सुभाष शिरोडकर यांनी शिरोडयात अनेक विकास कामे केलीच आहेत मात्र त्याबरोबर मतदारसंघातील लोकांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी विद्या मंदिरे उभारली आहेत.दूसरीकडे ढवळीकर यांनी मंदीरांच्या आडून लोकांमध्ये फुट पाडली आहे.ढवळीकर बंधूंच्या घराणेशाहीला जनता विटली आहे.त्यामुळे प्रियोळ प्रमाणेच शिरोडयाचे मतदार देखील दीपक ढवळीकर यांना घरचा रस्ता दाखवल्या शिवाय राहणार नाही,असे प्रतिपादन कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी आज बेतोडा पंचायत क्षेत्रात केले.
शिरोडयाचे भाजपचे उमेदवार सुभाष शिरोडकर यांच्या प्रचारासाठी गोविंद गावडे प्रचारात उतरले आहेत.
गावडे यांनी आज बेतोडा पंचायत क्षेत्रात मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार केला.
प्रियोळचा निकाल माहित असलेले शिरोडयाचे सुज्ञ मतदार शिरोडयात देखील योग्य तो निर्णय घेऊन प्रियोळचा एक्शन रिप्ले शिरोडयात घडवून आणतील असा विश्वास गावडे यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान सुभाष शिरोडकर यांनी आपल्या शेकडो समर्थकांसोबत बोरी पंचायत क्षेत्रात जाऊन घरोघरी प्रचार केला.शिरोडकर यांना चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या वेळपेक्षा जास्त मते घेऊन शिरोडकर निवडून येतील असा दावा,भाजप नेते दत्तप्रसाद नाईक यांनी केला आहे.