ढवळीकरच पटलावर ठेवतील अर्थसंकल्प

0
768

गोवाखबर:गोव्याचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी विधानसभेत येण्याची मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रचंड इच्छा आहे.मात्र त्यांनी आजारावर योग्य ते उपचार घेऊन लवकरात लवकर बरे होऊन गोव्यात यावे असा सगळ्यांचा आग्रह आहे.त्यामुळे आणखी 4 ते 5 दिवस उपचार घेऊनच मुख्यमंत्री गोव्यात परततील अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी दिली आहे.
गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस असून उद्या सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर अर्थसंकल्प पटलावर ठेवणार आहेत.पर्रिकर हे उद्या विधानसभेत येऊन अर्थसंकल्प सादर करणार असल्याची चर्चा आज सुरु होती.मुख्यमंत्री पर्रिकर यांची देखील अर्थसंकल्प सादर करण्याची प्रचंड इच्छा आहे.मात्र स्वादूपिंडाच्या विकारवर त्यांच्यावर मुंबईतील लीलावती हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत.त्यांच्यावर आणखी 4 ते 5 दिवस उपचार केले जाणार असून त्यांनी ते घेऊनच गोव्यात परतावे अशी सर्वांची मागणी आहे.सगळ्यांचा आग्रह असल्याने पर्रिकर उद्या अर्थसंकल्प सादर करण्यासाठी येणार नसुन उपचार पूर्ण झाल्यानंतर गोव्यात परत येतील असे तेंडुलकर यांनी स्पष्ट केले आहे.
लीलावती मधील उपचारांना पर्रिकर प्रतिसाद देत असून त्यांना अमेरिकेत नेण्यासंदर्भात कोणताच निर्णय झालेला नाही.अशा अफवा लोक का पसरवतात हे समजत नाही असे तेंडुलकर म्हणाले