ड्रग्स बाळगल्या प्रकरणी कर्नाटकच्या युवकास अटक

0
968
 गोवा:कळंगुट पोलिसांनी ड्रग्स विरोधी मोहिमेत आणखी एक यशस्वी कारवाई केली. कळंगुट येथे पर्यटकांना ड्रग्स विकण्याचा प्रयत्न करत असताना कळंगुट पोलिसांनी सापळा रचून मूळ कर्नाटक येथील सोमनाथ चव्हाण या युवकास गांजासह अटक केली. पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांना सोमनाथ हा ड्रग्स घेऊन पर्यटकांना विकण्यासाठी कळंगुट किनाऱ्यावर येणार असल्याची माहिती खात्रीशिर सुत्रांकडून मिळाली होती.त्यानंतर सापळा रचून सोमनाथ याला 15 हजार रूपयांच्या गांज्यासह अटक केली. याप्रकरणी दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ऋषिकेश पाटील अधिक तपास करत आहेत.