ड्रग्स बाळगल्या प्रकरणी प.बंगालच्या युवकाला अटक

0
934
गोवा खबर: कळंगुट मधील माडडोवाडो येथे कळंगुट पोलिसांनी धाड टाकून प.बंगाल येथील तस्लीम सरकार या 24 वर्षीय युवकाला हेरॉइन आणि कोकेन बाळगल्या प्रकरणी अटक केली.
पर्यटन हंगाम सुरु झाल्या पासून कळंगुट पोलिसांनी ड्रग्स विरोधातील मोहीम तीव्र केली आहे.काल मध्यरात्री ड्रग्स विरोधी कारवाई करत प.बंगाल मधील तस्लीमच्या मुसक्या आवळल्या.
कळंगुटचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहिती नुसार,पोलिसांना खात्रीशीर सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार तस्लीम हा मडडोवाडो येथील रॉयल गेस्ट हाउस जवळ ड्रग्स विकण्यासाठी येणार होता.
पोलिस निरीक्षक दळवी यांच्या मार्गदर्शना नुसार पोलिसांनी टीम बनवून रॉयल गेस्ट हाउस कडे सापळा रचला.थोड्याच वेळात तस्लीम तेथे येताना दिसताच पोलिसांनी झडप घालून त्याला पकडून त्याची झडती घेतली.
पोलिसांना तस्लीम कडे 45 हजार रुपये किंमतीचे हेरॉइन आणि 35 हजार रुपये किंमतीचे कोकेन सापडले.
तस्लीमला पोलिस स्टेशन मध्ये आणून त्याला ड्रग्स बाळगल्या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी अटक  केली आहे.त्याच्या विरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांच्या पथकामध्ये पोलिस उपनिरीक्षक रमेश शिरोडकर,कॉन्स्टेबल दिनेश मोरजकर,गोविंद शिरोडकर,वल्लभ पेडणेकर आणि विनोद केरकर यांचा समावेश होता.