ड्रग्सला आळा घालण्यासाठी सिंगापुरसारखे कडक कायदे हवे-राणे

0
1109

 

ड्रग्सचा वाढलेला सुळसुळाट ही चिंताजनक बाब आहे.ड्रग्सचा काळाबाजार गोव्यातून हद्दपार व्हायला हवा.प्रसंगी सिंगापुर सारख्या कडक कायद्याची गरज आहे असे मत माजी मुख्यमंत्री तथा पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे यांनी व्यक्त केले आहे.
गोव्यात वाढत चाललेल्या ड्रग्सच्या गैरधंद्याला आळा घालण्यासाठी काय करण्याची गरज आहे असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता राणे म्हणाले,सिंगापुर मध्ये उतरल्यानंतर तेथे एक सूचना पत्र दिले जाते त्यात स्पष्टपणे उल्लेख असतो की ड्रग्सच्या प्रकरणात सापडला तर जन्मठेपेची शिक्षा केली जाईल. आपल्या देशात एवढी कडक शिक्षा होईल असा कायदा करता येईल याबद्दल साशंकता असली तरी जास्तीत जास्त कडक कायदा करून हे प्रकार कायमचे रोखण्याची गरज आहे.
राणे यांनी पोलिस यंत्रणेने आणखी दक्ष राहण्याची गरज असल्याचे स्पष्ट करत शाळा,कॉलेज समोर संशयास्पद फिरणाऱ्या वाहनांवर बारीक नजर ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले.
किनारी भागात ड्रग्स बाबत परिस्थिती हाताबाहेर गेली असल्याचे सांगून राणे म्हणाले बाहेरच्या लोकांबरोबर स्थानिक लोक यात गुंतले असून त्याला आळा घालण्याची गरज असल्याचे राणे म्हणाले.राणे यांनी बीचवर झोपलेल्या माणसाकडे ड्रग्स मिळते त्याची संबंधितांना कल्पना असते असे उदाहरण देखील दिले.