पणजी:ठाणे येथे २.७ लाखांच्या अमलीपदार्थप्रकरणी हवा असलेला संशयित कुमिल ऊर्फ कोमिल मर्चंट याला कळंगुट परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. संशयित वास्तव्यास असलेल्या हॉटेलला गराडा घालून कळंगुट पोलिसांनी त्याला जेरबंद केले.
गेल्या १४ नोव्हेंबर रोजी ठाणे येथे टाकण्यात आलेल्या छाप्यावेळी ठाणे पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने मुबाशीर माठवणकर, श्याम खान, सिराज शेख, जावेद अन्सारी यांना अटक केली होती. तर, आणखी एक संशयित कुमिल ऊर्फ कोमिल मर्चंट फरार होता. कळंगुटचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला ताब्यात घेण्यात आले.