ड्रगप्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोण,श्रद्धा कपूर व सारा अली खानला समन्स

0
221
गोवा खबर:अभिनेता सुशांत राजपूत मृत्यू प्रकरणाततील ड्रग्स कनेक्शन संदर्भात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो(एनसीबी)ने गोव्यात चित्रीकरणासाठी आलेल्या अभिनेत्री दीपिका पदुकोणसह सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंगला समन्स पाठवले आहे. पुढील तीन दिवसांत त्यांना याबद्दल खुलासा द्यावा लागणार आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित अनेक गोष्टींचा अजून उलगडा झाला नाही. पण त्यातील एका मुद्द्याच्या अनुषंगाने तपास सुरु असताना अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत.चित्रपटसृष्टीचे ड्रग कनेक्शन यामुळे उघडकीस येत आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीला अटक केल्यानंतर तिने ड्रग घेत असल्याचे कबूल केले आहे.
एनसीबी सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांच्या वृत्तांत म्हटले आहे की, ड्रग्जशी संबंधित व्हॉट्सॲप चॅटमध्ये तिचे नाव समोर आले आहे. एनसीबीने सोमवारी सुशांतची मॅनेजर श्रुती मोदी व टॅलेंट मॅनेजर जया साहाची ५ तास चौकशी केली.
या संबंधित मिळालेल्या माहितीनुसार ड्रग्जबाबत २८ ऑक्टोबर २०१७ च्या व्हॉट्सॲप चॅटमध्ये दीपिका पदुकोणचे नाव आले आहे. यात ‘डी’ हा कोडवर्ड दीपिकासाठी असल्याचे सांगितले जाते.
एका चॅनलच्या दाव्यानुसार, चॅटमध्ये दीपिका ‘के’ला ‘माल’बाबत विचारते. ती उत्तरते, हे तिच्याकडे आहे, मात्र घरी ठेवलेले आहे. नंतर ‘के’ म्हणते की ती तिला काय हवं आहे ती ‘अमित’ला विचारू शकते. दीपिका स्पष्ट करते की तिला ‘हॅश’ हवे आहे, ‘वीड’ नव्हे.