डॉ सुनील कुमार सिंग यांना इंडियन नॅशनल सायन्स अकादमी फेलोशिप

0
979

 

गोवा खबर:राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेचे (एनआयओ) संचालक डॉ सुनील कुमार सिंग यांची इंडियन नॅशनल सायन्स अकादमी (आयएनएसए), नवी दिल्ली साठी निवड झाली आहे. आयएनएसए ही विज्ञान क्षेत्रातील तीन अग्रणी संस्थांपैकी एक आहे. 1 जानेवारी 2019 पासून डॉ सुनील कुमार सिंग यांना ही फेलोशिप लागू होईल.

डॉ सिंग यांच्या नावावर शंभरपेक्षाही अधिक संशोधन लेख आहेत. हिमालयावर होणारा हवामानबदलाचा परिणाम यावर त्यांनी संशोधन केले आहे. यापूर्वी डॉ सिंग यांना नॅशनल जिओसायन्स अवार्ड (2012), फेलो ऑफ दी इंडियन अकादमी ऑफ सायन्सेस, इमिनन्ट मास स्पेकट्रोमेट्री अवार्ड (2014), दी कौन्सिल ऑफ सायन्टीफीक अँड इंडस्ट्रीअल रिसर्च संस्थेकडून शांती स्वरुप भटनागर पुरस्कार 2016 प्राप्त झाला आहे.