डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

0
101

गोवा खबर : माजी राष्ट्रपती डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली  अर्पण केली आहे.

“डॉ. कलाम यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली. एक वैज्ञानिक आणि राष्ट्रपती म्हणून डॉ. कलाम यांचे राष्ट्रीय विकासातील अमूल्य योगदान भारत कधीही विसरू शकत नाही. त्यांचा जीवन प्रवास लाखो लोकांना प्रेरणा देतो.”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपतींची आदरांजली

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी गुरुवारी 15 ऑक्टोबर 2020 रोजी माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून राष्ट्रपती आणि राष्ट्रपती भवनातील अधिकाऱ्यांनी अभिवादन केले.