डॉ. आंबेडकर यांची  जयंती फक्त  समाज कल्याण संचालनालयामध्ये साजरी करणार

0
727

गोवा खबर:डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची  129 वी जयंती 14 एप्रिल  2020 रोजी समाजकल्याण संचालनालयाच्या पणजी  मुख्यालयात  साजरी करण्याचा निर्णय सरकाराने घेतला आहे. या कार्यक्रमाला संचालनालयाचे मुख्य कर्मचारी हजर असणार आहेत  आणि समाज कल्याण खात्याचे संचालक डॉ. आंबेडकर यांच्या तसबिरीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील.

कोरोनो वायरस महामारी आणि  तो पसरू नये म्हणून घेतलेल्या  लॉकडाउनच्या  पार्श्वभूमीवर  हा  निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची  जयंती दरवर्षी 14 एप्रिलला साजरी केली जाते.

कोव्हीड -19 आरोग्य  आपत्तीच्या पार्श्वभूमीवर  कोणताही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नये असे आवाहन सगळ्या संघटनांना करण्यात आले आहे.