डॉ. अमेय वेलिंगकर- ‘ज्युनाइन नी सिस्टिम’ या भारतातील पहिल्या गुडघाजोड रचनेचा विकास आणि उत्पादन करणारे पहिला गोमंतकीय डिझायनर सर्जन

0
909
गोवाखबर: गोव्यातील एकमेव ऑर्थोपेडिक सर्जन, तर भारतातील मोजक्या नामवंत ऑर्थोपेडिक सर्जनमध्ये सहभाग असलेले आणि सांधेजोड प्रत्यारोपणासाठी आवश्यक आणि भारतीयांच्या शरीरयष्टीस अनुरूप असा पहिलावहिला गुडघा, ज्युनाइन नी सिस्टिम, विकसित करण्यामध्ये भारतातील मोजकेच अनुभवी व नामंवत ऑर्थोपेडिक सर्जन सहभागी झाले होते, आणि यामध्ये गुडघा सांधाजोड प्रणालीतील रचना निर्मितीत आपल्या गोव्यातील डॉ. अमेय वेलिंगकर यांचेही मोठे योगदान राहिले आहे.
भारतातील गुडघ्याचा सांधाजोड विषयक आरोग्य समस्या असलेल्या रुग्णांना पुन्हा आपल्या पायावर समर्थपणे उभे करण्याच्या उद्देशाने या गुडघ्याची रचना सुमारे ९ वर्षांपूर्वी विकसित केली गेली. तर ७ वर्षांपूव्री या गुडघा रचनेचे अंतिम प्रारूपावर या उद्योगक्षेत्रातील कार्यरत विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांनी स्थापित केलेल्या विविध खडतर चाचण्या घेण्यास सुरवात झाली. जगातील एक नामांकित एन्डो-प्रोस्थेसिस प्रयोगशाळा म्हणून गणल्या गेलेल्या एन्डोलॅब- जर्मनी मध्ये अनेक वर्षे या गुडघा प्रारूपावर खडतर चाचण्या घेण्यात आल्या. आणि विशेष म्हणजे विविध चाचण्यांमध्ये या ज्युनाइन नी सिस्टिमचा झीज होण्याचा दर हा अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी निश्चित केलेल्या झीज-दरापेक्षा कमी राहिला.
भारतीय गुडघ्याची रचना करण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे आजवर जगभरात विकसित गुडघा प्रारुपांच्या वापरामुळे अशियाई लोकांना अपेक्षित लाभ होत नसल्याच्या, अपेक्षित समाधान मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. संपूर्ण गुडघाजोड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्यानंतर, काउकेशियन किंवा पाश्चिमात्य रुग्णांच्या तुलनेत भारतीय रुग्णांचे समाधान होत नसल्याचे अनुभव येत होते. यामागील कारणांबाबत भारतामध्ये होणाऱ्या विविध ऑर्थोपेडिक परिषदा आणि बैठकांमध्ये सातत्याने केला गेला आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांनी विकसित केलेली याबाबतची उत्पादने भारतीयांसाठी लाभदायक ठरत नसून, आर्थिक बाबतीतही सर्वच घटकांतील रुग्णांना परवडत नसल्याबाबत मंथन केले गेले.
बायोरॅड मेडिसिजने श्री. जितेंद्र हेगडे, एमडी यांच्या नेतृत्वाखाली या प्रत्यारोपण सांध्याची मुख्य समस्या म्हणजे या सांध्याचा आकार असल्याचे शोधले. आयआयटी मुंबईमधील बायो-मेडिकल इंजिनिअरिंगच्या पथकाच्या सहकार्याने हे वास्तव आकृतींच्या माध्यमातून सिद्ध करण्यात आले. भारतीय व्यक्तींच्या शरीरयष्टीची रचना पाहता, काउकेशियन किंवा आफ्रिकी व्यक्तीच्या तुलनेत भारतीय व्यक्तीची हाडे आकाराने छोटी असतात. या मूलभूत बदलामुळे अनेक सांधजोड प्रत्यारोपण विशारदांना नेहमीच कठीण प्रसंगांचा सामना करावा लागत आला
आणि रुग्णास कमीत कमी वेदना होतील आणि त्याचे जास्तीत जास्त समाधान होईल यासाठी उपलब्ध गुडघाजोड प्रारूपांतून योग्य निवड त्यांना करावी लागत असते.
जीवन म्हणजे एक क्रांतीच आहे याचा प्रत्यय सांधेजोड प्रत्यारोपण क्षेत्रातही आला. भारतीयांना भारतीय उत्पादनांवर विश्वास ठेवणे कठीण जाते असा पूर्वीचा अनुभव आहे, पण आता आकडेवारीच आता आपले मत बदलवेल. भारतातील सांधेजोड प्रत्यारोपण क्षेत्रामध्ये, डॉ. अमेय वेलिंगकर यांनी विकसित केलेल्या वेदनारहित ज्युनाइन नी सिस्टिमने आश्वासक अनुभव, प्रतिसाद मिळवण्यात यश कमावले आहे.
डिझायनर सर्जन डॉ. अमेय वेलिंगकर यांनी विकसित केलेल्या ज्युनाइन नी द्वारे गोव्यातील १००वी यशस्वी सांधेजोड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा टप्पा साजरा करण्यासाठी आपण सर्वजण येथे जमलो आहोत. २१ एप्रिल रोजी मेट्रोपोल मडगाव येथे आनंदी, समाधानी रुग्णांची सेलिब्रेशन पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.
२००३ पासून डॉ. अमेय वेलिंगकर हे सांधेजोड प्रत्यारोपण क्षेत्रात, अपोलो ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या माध्यमातून कार्यरत होते. वयाच्या २७व्या वर्षी पहिली गुडघाजोड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून अशी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणारे सर्वाधिक तरुण डॉक्टर बनण्याचा मान त्यांना मिळाला होता. इंडियन सोसायटी ऑफ हिप अँड नी सर्जन्स कसेच इंडियन आर्थोप्लास्टी असोसिएशन या संस्थाचे सर्वांत तरुण आजीव सदस्य ते आहेत. जॉन्सन अँड जॉन्सनचे आरएफपी तंत्रज्ञान, झमरचे जेंडर नी, ड्रॉम सरफेस रिप्लेसमेंट अशा आधिनुक तंत्रज्ञानाचा गोव्यात सर्वप्रथम अवलंब करण्यातही त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.
सांधजोड प्रत्यारोरोपण क्षेत्रातील दैदिप्यमान १५ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये आता जगभारतील सर्व बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मापदंडानुरूप भारतातील पहिला विकसित आणि उत्पादित ज्युनाइन नी सिस्टिमच्या माध्यमातून पहिले गोमंतकीय डिझायनर सर्जन बनण्याची कामगिरी त्यांच्या नावावर नोंदली जात आहे.
या पूर्णतः भारतीय बनावटीच्या कार्याला सलाम.
प्रतिक्रिया:  
गुडघ्याचा सांधाजोड प्रत्यारोपी केलेल्या ७५% रुग्णांना या शस्त्रक्रियेमुळे पूर्ण समाधान मिळाला नसल्याचे आणि शस्त्रक्रियेनंतरही गुडघ्यामध्ये वेदना होत असल्याचे अनुभव आहेत. भारतीय व्यक्तींच्या शरीरयष्टीची रचना पाहता, काउकेशियन किंवा आफ्रिकी व्यक्तीच्या तुलनेत भारतीय व्यक्तीची हाडे आकाराने छोटी असल्याचे यामागचे मुलूभत कारण आहे. अशियाई व्यक्तींच्या शरीरयष्टीबाबत अँथ्रोपोमेट्रिक सांख्यिकी विश्लेषण आणि शरीरातील हाडांच्या रचनेचा सखोल अभ्यास करून बायोरॅड मेडिसिजने अशियाई व्यक्तीस अनुरूप अशी ज्युनाइन नी सिस्टिम प्रारूप विकसित केले. मेक इन इंडिया या उपक्रमाअंतर्गत विकसित ही गुडघाजोड प्रणाली देशातील अनेक रुग्णांना वरदान ठरली असून पाश्चिमात्य व्यक्तींप्रमाणेच वेदनामुक्तीसह पायाची नैसर्गिक हालचाल करण्याचा परिपूर्ण आनंद घेणे भारतीय रुग्णांना शक्य झाले आहे.