डॉक्टर हे नेहमीच डॉक्टर!

0
1046
गोवाखबर:गोवा विधानसभेचे सभापती प्रमोद सावंत हे पेशाने डॉक्टर आहेत, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे.या पेशात रुग्णांची सेवा हा महत्वाचा भाग असतो.डॉक्टर असलेला माणूस आपल्या सार्वजनिक जीवनात कितीही मोठ्या पदावर असला तरी तो माणूस डॉक्टरी पेशामधील सेवा भाव विसरत नाही.सभापतींनी सुद्धा नुकताच याचा प्रत्यय दिला. कुडणे-पावलार येथे झालेल्या अपघातामध्ये हरी फाळकर जखमी झाले होते.त्याच दरम्यान आपल्या सरकारी ताफ्यासह तेथून जात असलेल्या सभापतींच्या नजरसे ही घटना पडली.लागलीच गाडी थांबवून त्यांनी जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या फाळकर यांच्याकडे धाव घेत प्रथमोपचार सुरु केले. फाळकर यांच्या डोक्याला दुखापत झाली होती.सभापतींनी फाळकर यांच्या डोक्याला झालेल्या जखमेला पट्टी बांधली शिवाय फाळकर यांना आपल्या कार मधून  साखळी हॉस्पिटल मध्ये नेले.साखळी येथे उपचार करून झाल्यानंतर फाळकर यांना गोमेकॉ मध्ये तातडीने पाठवण्याची व्यवस्था सभापतींनी केली. सभापतींनी प्रोटोकॉल बाजूला ठेवून आपल्या पेशाची शान वाढवणारे काम करून लोकांच्या मनातील आपले स्थान आणखी भक्कम केले आहे.