डेल्टिन ग्रुप तर्फे कोविड- १९ च्या विरोधातील लढ्यामध्ये गोवा सरकारला सहकार्य

0
435
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कडे मदतीचा चेक सुपूर्द करतांना ग्रुप प्रेसिडेंट- ऑपरेशन्स  श्री अनिल मलानी. 

 

गोवा खबर: कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने जगभरांत हाहाकार माजवला आहे.  हा आजार वेगाने पसरतांना दिसत तर आहेच पण त्याच बरोबर याचा घातक परिणाम लोकांच्या शारिरीक, मानसिक आणि आर्थिक जीवनावरही झाला आहे.  सध्या भारत हा जगभरांतील सर्वांत मोठ्या लॉकडाऊन्स पैकी एका लॉकडाऊनचा अनुभव घेत असून त्यामुळे मानवाचा एकमेकांशी संपर्क टाळून व्हायरसचा परिणाम कमी करण्यावर भर दिला जात आहे.

संपूर्ण राष्ट्र हे सध्या कोविड १९ च्या साथीचा मुकाबला एकत्र येऊन करत असतांनाच, डेल्टिन ग्रुप कडून ही एक पाऊल पुढे टाकण्यात येत असून कंपनी कडून ५.१० दशलक्ष रूपयांची मदत ही गोवा सरकारला कोविड १९च्या पसरलेल्या साथीचा मुकाबला करण्यासाठी करण्यात आली आहे.  त्याच बरोबर डेल्टिन ग्रुप कडून गोव्यातील जनतेला सहकार्य करण्यासाठी औषधे, वैद्यकीय उपकरणे, जरूरी पदार्थ आणि अन्य उत्पादनांची खरेदी करण्यासाठी ही सहकार्य करण्यात येत आहे. यामुळे कोविड १९ च्या वाढत्या वैद्यकीय आणि मानवी संकटावर मात करण्यास मदत होऊ शकेल.

या उपक्रमा विषयी माहिती देतांना डेल्टिन ग्रुप चे चेअरमन श्री जयदेव मोदी यांनी सांगितले “ डेल्टिन मध्ये आम्ही नेहमीच गोवा सरकारला कोरोना व्हायरसशी लढा देण्यास सहकार्य केले आहे.  हा काळ आपल्यासाठी आव्हानात्मक असा काळ असून अनेकांना कोविड १९ चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.  डेल्टिन ग्रुप चा असा  विश्वास आहे की सामान्य नागरिकांमध्ये जागरूकता ‍निर्माण करून गरजवंताना नेहमीच मदत करण्याची गरज आहे.   आम्ही यासाठी एकत्र येत आहोत आणि प्रत्येकाने एकमेकांची काळजी घेण्याची गरज आहे.  त्याच बरोबर मी वैयक्तिकरित्या कोविड१९ शी लढा देणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे आभार मानतो.”