गोवा खबर:आरोग्य सेवा संचालकांनीदिलेल्या माहितीनुसार, एअर इंडिया उड्डणावरून गोव्यात पोहोचलेल्या प्रवासी इतिहास असलेले गोवा वैद्यकीय महाविद्यालात ०३ एप्रिल २०२० आणि ०४ एप्रिल २०२० रोजी कोरोना विषाणूजन्य (कोविड-१९) आजाराचे दोन रुग्ण सापडले आहेत.
कॅप्मटन पार्क ते जोहॅनसबर्ग ते केनिया ते मुंबई ते गोवा आणि एअर इंडिया एआय661 या उड्डाणातून मुंबई ते गोवा असा व्हाया प्रवास करून १९ मार्च २०२० रोजी गोव्यात पोहोचल्याचा गोवा वैद्यकीय महाविद्यालयात ०३ एप्रिल २०२० रोजी कोरोना विषाणूजन्य आजाराचा पोझिटिव्ह असलेल्या रुग्णाच्या प्रवासाचा इतिहास आहे.
गोवा खबर:गोवा खबर:3 एप्रिल रोजी जो पेशंट कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे तो केम्पटॉन पार्क ते जोहान्सबर्ग आणि जोहान्सबर्ग येथून केनिया आणि केनिया येथून मुंबईत आला होता.मुंबई मधून 19 मार्च रोजी एअर इंडियाच्या AI 661 नंबरच्या विमानाने गोव्यात दाखल झाला आहे. pic.twitter.com/coCB9a0ITe
— Dev walavalkar (@walavalkar) April 4, 2020
सॅन फ्रान्सिस्को ते नवी दिल्ली ते गोवा आणि एअर इंडिया एआय883 या उड्डाणातून नवी दिल्ली ते गोवा असा व्हाया प्रवास करून २२ मार्च २०२० रोजी गोव्यात पोहोचल्याचा गोवा वैद्यकीय महाविद्यालयात ०४ एप्रिल २०२० रोजी कोरोना विषाणूजन्य आजाराचा पोझिटिव्ह असलेल्या रुग्णाच्या प्रवासाचा इतिहास आहे.
म्हणूनच, आरोग्य सेवा संचालकांनी लोकांना आवाहन केले आहे की, गोव्यात सद्या असेलेल्या व्यक्तींनी जर सदर उड्डाणातून प्रवास केलेला असेल तर त्यांनी स्वतःचे विलगीकरण करणे (होम कॉरन्टाईन) आणि त्वरित हेल्पलाईन क्रमांक 104 किंवा 0832-2421810/2225538 किंवा जवळच्या सरकारी आरोग्य सुविधेशी संपर्क साधावा.