‘डिस्पाईट द फॉग’ या इटालियन चित्रपटाने 50 व्या इफ्फीचा प्रारंभ होणार

0
629

 गोवा खबर:प्रसिद्ध युरोपियन दिग्दर्शक गोरान पास्कलजेविक यांच्या ‘डिस्पाईट द फॉग’ या इटालियन चित्रपटाने 50 व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला प्रारंभ होणार आहे.

 

या चित्रपटाची कथा रोममधल्या पावलो या हॉटेल मालकाची असून एका पावसाळी रात्री घरी परतत असताना त्याला बसस्टॉपवर एक अनाथ मुलगा दिसतो. पावलो या अनाथ मुलाला घरी आणतो. त्याच्या पत्नीला हा मुलगा घरी आलेला आवडत नाही, मात्र नंतर ती त्याला घरी ठेऊन घेते अशी या चित्रपटाची कथा आहे.