डाॅ. प्रमोद सावंतानी  ३ सप्टेंबरला खासगी इस्पितळात जाण्यासाठी होम काॅरंटाइन नियम का तोडला हे मुख्यमंत्र्यानी शोधावे : गिरीश चोडणकर

0
877
गोवा खबर : मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंतांच्या खासगी इस्पितळातील भेटीला वेगळे वळण देताना काॅंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्याना कोविडची बाधा झाल्यानंतर होम काॅरंटाइन झालेल्या डाॅ. प्रमोद सावंतानी कॉरंटाइनचे नियम तोडुन ३ सप्टेंबरला एका खासगी इस्पितळाला का भेट दिली होती ते शोधावे अशी मागणी केली आहे.

 ४ सप्टेंबर रोजी केलेल्या ट्विट मध्ये मुख्यमंत्र्यानी कोविड चाचणी कोठे केली असा प्रश्न विचारला होता व त्याला डाॅ. प्रमोद सावंतानी सरकारी इस्पितळात केलेल्या कोविड चाचणी अहवालाच्या प्रतिसह उत्तर दिले आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हॅडलवरुन अजुनही काहीच उत्तर आलेले नाही,याकडे चोडणकर यांनी लक्ष वेधले आहे.
आता मुख्यमंत्र्यानी डाॅ. प्रमोद सावंत हे ३ सप्टेंबर रोजी होम काॅरंटाइन नियम मोडुन एका खासगी इस्पितळात का गेले होते व तेथे त्यांनी स्वतःची चाचणी करुन घेतली का इतर कुणाची चाचणी केली ते शोधावे, अशी मागणी  चोडणकर यांनी केली आहे. सत्य सर्वांसमोर येणे गरजेचे आहे,असे चोडणकर म्हणाले.