ट्राय गोवा फोंडेशनतर्फे ४ ऑक्टोबर रोजी पणजी आणि मडगावात सायकल राईडचे आयोजन

0
260

 

 

गोवा खबर :  ट्राय गोवा फोंडेशनतर्फे रविवार ४ ऑक्टोबर रोजी  पणजी आणि मडगाव येथे १०० आणि ५० किमी सायकल राईडचे आयोजन केले जाणार आहे.

उत्तर आणि दक्षिण गोव्यातील सायकलिस्टसाठी सोयीचे व्हावे यासाठी पणजी आणि मडगाव येथे स्वतंत्ररित्या राईडचे आयोजन करण्यात आले आहे.

ट्राय गोवाचे संस्थापक राजेश मल्होत्रा यांनी याविषयी घोषणा करताना सांगितले की त्याच दिवशी नवीन सायकलिस्टसाठी पणजी आणि मडगाव येथे ५० किमीच्या सायकल राईड्स आयोजित करण्यात आल्या आहेत.पुढे बोलताना ते म्हणाले की नवीन रायडर्सनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील औडक्स ब्रेवेट पद्धतीचा (२००किमी,३००किमी,४००किमी आणि ६००किमी)अनुभव घेण्यास प्रोत्साहित व्हावे यासाठी १०० किमी राईडचे आयोजन करण्यात आले आहे तसेच अनुभवी एनडूरन्स सायकलिस्टसाठी ऑक्टोबर २०२० मध्ये होणाऱ्या ब्रेवेट सिजनचा सराव होईल.पुढे ते म्हणाले की ही शर्यत नाही आणि सायकलिस्टला मेडल जिंकण्यासाठी ठरलेल्या वेळेत शर्यत पूर्ण करावी लागेल.सर्व स्पर्धकांना कोविड-१९ च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे लागेल तसेच त्यांना सुरवात, शेवट तसेच कंट्रोल पॉईंटवर मास्क घालणे आणि सुरक्षित अंतर राखणे आवश्यक आहे.

या राईडमध्ये सहभागी होण्यासाठी किमान वय वर्ष १५ असणे आवश्यक आहेत तसेच ज्यांचे वय १८ वर्षा खाली आहे त्यांना आपल्या  पालकांना सोबत या राईड मध्ये भाग घ्यावा लागेल.

पणजीमधील १०० किमीची सायकल राईड सांत ईनेज येथील प्रोबाईक सायकल स्टोर पासून सकाळी ६.३० वाजता सुरू होईल आणि दुपारी २ वाजता संपेल तर ५० किमीची  राईड सकाळी ६.४५ वाजता सुरू होईल व १०.४५  ला संपेल.मडगावमधील १०० किमीची सायकल राईड मल्टीपर्पज शाळेजवळून त्याचवेळी सुरू होईल व तेथेच संपेल.ते पुढे म्हणाले की सर्व रायडर्स हे सेल्फ सपोर्टेड असतील तरीही रुग्णवाहिका आणि नियंत्रण वाहन हे उपलब्ध असेल.

इच्छुकांनी खालील लिंकवर नोंदणी करावी

https://www.instamojo.com/GearWorx/trigoa-century-ride/