ट्रायगोवा यांची 200 किमी आणि 300 किमी सायकल राईड 18 आणि  24 रोजी

0
111

गोवा खबर : पणजी, ट्रायगोवा फाउंडेशन यांच्यातर्फे रविवारी 18 आणि 24 ऑक्टोबर रोजी 200 किमी आणि 300 किमी अंतरांची सायकल राईड आयोजित केली. ब्रेव्हेट डी रॅन्डनूर मॉन्डियाक्स (बीआरएम)2019-20 हंगामातील शेवटच्या दोन, लांब पल्ल्याच्या सायकल राइडचे हे आयोजन असणार आहे.

सोमवारी शहरात प्रसिद्ध झालेल्या एका प्रसिद्धीपत्रकात ट्रायगोवा फाउंडेशनचे संस्थापक राजेश मल्होत्रा ​​यांनी सांगितले की, ऑडॅक्स इंडिया रॅन्डननियर्स (एआयआर) शी ट्रायगोवा संलग्नित क्लब आहे आणि ऑडॅक्स क्लब पॅरिसियन (एसीपी), फ्रान्सच्या वतीने ब्रेव्हेट डी रॅन्डनॉनर मोंडियॅक (बीआरएम) २०० कि.मी. सायकल राईड आयोजित करण्यात येत आहे.

मल्होत्रा यांच्यामते, सर्व यशस्वी फिनिशर्सना एसीपी, फ्रान्सकडून मेडल मिळेल. सुपर रॅन्डननुर्स (एसआर) (एक कॅलेंडर वर्षात 200 कि.मी., 300 कि.मी., 400 कि.मी. आणि 600 कि.मी. सायकल चालविणाच्या सायकलस्वारांना) प्रतिष्ठित पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस (पीबीपी) आणि लंडन-एडिनबर्ग-लंडन (एलईएल) दर चार वर्षांनी 1200 किमी आणि 1400 किमी बीआरएमच्या राईडसाठी ते पात्र ठरतील.

दिलेल्या माहितीनुसार, ब्रेव्हेट डी रॅन्डनॉनर मोंडियॅक (बीआरएम) नावाच्या 200, 300, 400, 600 आणि 1000 कि.मी. अंतरांच्या राईडचे आयोजन करण्यात येते. 18 ऑक्टोबरला 200 कि.मी. सायकल राईडचा पणजी- पर्वरी-डिचोली-होंडा-उसगाव-मोलेम-कुलेम- कुडचडे-बाळी-मडगाव-बोरी-लोटली-झुआरी ब्रीज-ओल्ड गोवा-पणजी असा मार्ग आहे. इच्छुक रायडरनी : https://www.audaxindia.org/event-e-4513  येथे नोंदणी करावी.

नोंदणीसाठी 15 ऑक्टोबर अंतिम तारीख आहे. ऑडॅक्स क्लब पॅरिसियन (एसीपी) ही जगभरातील बीआरएमच्या संचालनाची देखरेख करणारी आंतरराष्ट्रीय कार्यकारी संस्था आहे. राइडिंगची ही शैली नॉन कॉम्पिटेटिव्हआहे आणि यासाठी स्वयंपूर्णता सर्वात महत्वाची आहे. अशा रँडोननेउरिंग कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याबाबतचा इतिहास फ्रान्स आणि इटलीमधील सायकलिंगच्या सुरवातीच्या टप्प्याशी निगडित आहे. मैत्रीपूर्ण कॅमेरेडी आणि चिकाटी हे रँडोननेउरिंगचे वैशिष्ट्य आहे, ”असे मल्होत्रा म्हणाले.

मल्होत्रा म्हणाले, रँडोननेउरिंग (लॉंग डिस्टन्स इंडयुरन्स सायकलिंग) मध्ये रायडर प्रीडिटरमाईनड कंट्रोल पॉईंट्समधून 200 किमी किंवा त्याहून अधिक कोर्सेसचा प्रयत्न करतात. रायडर्सनी निश्चित वेळेत लक्ष्य पूर्ण केले पाहिजे. रायडर्स आपल्या इच्छेनुसार गट किंवा एकट्याने ते ही राईड पूर्ण करू शकतात आणि दोन कंट्रोलच्या बाबतीत स्वयंपूर्ण असणे अपेक्षित असते.