टीव्हीएस मोटर कंपनीने लाँच केली पहिली 125cc ची स्कूटर- 

0
1332
TVS NTORQ 125; शैली, कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा मिलाफ!
• टीव्हीएसच्या रेसिंगमधील अनुभवामुळे श्रेष्ठ कामगिरी
• TVS SmartXonnect सह* भारतातील पहिली कनेक्टेड स्कूटर
• भारतातील पहिली अॅप अनेबल्ड स्कूटर
  
स्कूटरमध्ये प्रथमच
• TVS SmartXonnect*
• ब्लूटूथ एनेबल्ड स्कूटर
• सेलफोन कनेक्टिव्हिटी
• नेव्हिगेशन असिस्ट
• मल्टीमोड्स- रस्त्यावरील आणि शर्यतीतील राइड्सची आकडेवारी
• इन-बिल्ट लॅप टायमर
• अॅप अनेबल्ड पार्किंग लोकेटर
• अॅप असिस्टन्स
• इंजिन किल स्विच
• स्पीडोमीटरवर इंजिन ऑइलच्या तापमानाचा डिसप्ले
टीव्हीएस मोटर कंपनी या दुचाकी व तीनचाकी वाहनांचे उत्पादन करणार्‍या जगातील आघाडीच्या कंपनीने आज TVS NTORQ 125 लाँच करून 125cc स्‍कूटर विभागात प्रवेशाची घोषणा केली.  तरुणाईला डोळ्यापुढे ठेवून TVS NTORQ 125 ची
रचना करण्यात आली असून टीव्हीएसने रेसिंग मधील अनुभव वापरून ही स्कूटर विकसित केली आहे. या स्कूटरमध्ये अद्ययावत CVTi-REVV 3Valve इंजिन आहे. त्याचप्रमाणे या स्कूटरसोबत TVS SmartXonnect* या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मचेही लाँचिंग झाले असून, ही भारतातील पहिली कनेक्टेड स्कूटर आहे.
लाँचच्या वेळी टीव्हीएस मोटर कंपनीचे प्रवासी मोटरसायकल्‍स, स्‍कूटर्स व कॉर्पोरेट ब्रॅण्‍डचे उपाध्‍यक्ष (विपणन) श्री. अनिरुद्ध हल्‍दर म्हणाले, “TVS NTORQ 125 ही स्‍पोर्टी, स्‍टायलिश, हाय परफॉर्मन्‍स व तंत्रज्ञान सक्षम स्‍कूटर आहे. ही स्‍कूटर आजच्‍या तरुण पिढीसाठी डिझाइन, विकसित व तयार करण्‍यात आलेली आहे. सर्वोत्‍तम राइड व ऑटोमोटिव्‍ह ऑफरिंग देणारी ही भारताची पहिली ब्‍ल्‍यूटूथ कनेक्‍टेड स्‍कूटर आहे. TVS NTORQ 125 मध्‍ये भारतीय तरुण पिढीला सर्वोत्‍तम ग्राहक अनुभव देण्‍यासाठी स्‍टाइल, परफॉर्मन्‍स, सर्वोत्‍तम वैशिष्‍ट्ये व तंत्रज्ञान समाविष्‍ट आहे.”
 
स्टाईल
स्टेल्थ एअरक्राफ्टची (अस्तित्व जाणवून येण्‍याच्‍या उद्देशाने रचना केलेली विमाने) रचना डोक्यात ठेवून डिझाइन करण्यात आलेल्या TVS NTORQ 125 ची शैली स्पष्ट आक्रमक असून सिग्नेचरटेल आणि एलईडी टेल लॅम्प्स या स्कूटरची वैशिष्ट्ये आहेत. योग्य जागी असलेले सफाईदार कट्स स्कूटरच्या आकर्षकतेत भर घालतात. त्याचप्रमाणे तिला एक निमुळता पण दमदार लूक आहे. दणकट स्टब मफलर (वाहनातून येणारा आवाज कमी करणारा भाग), आक्रमक हेडलॅम्‍प क्‍लस्‍टर आणि टेक्स्चर्ड फ्लोअर बोर्डसह डायमंड कटमधील अलॉय व्हील्स यामुळे या स्कूटरला एक उठावदार शैली प्राप्त झाली आहे.
  
कामगिरी
TVS NTORQ 125 या स्कूटरला टीव्हीएसच्या रेसिंग क्षेत्रातील अनुभवाचा फायदा मिळाला आहे. टीव्हीएस रेसिंग स्कूटर्ससह भारतातील स्कूटर शर्यतींमध्ये भाग घेणाऱ्या टीम्स गेली चार वर्षे अजिंक्य आहेत. TVS NTORQ 125 मध्ये अत्याधुनिक CVTi-REVV 124.79 cc, सिंगल-सिलिंडर, 4-स्ट्रोक, 3-व्हॉल्व्ह, एअर कुल्ड एसओएचसी इंजिन असून त्यातून 6.9kW@7500 rpm / 9.4 PS @7500 rpm (दर मिनिटाला होणारी रिव्होल्यूशन्स) आणि 10.5 Nm@5500 rpm ऊर्जा मिळते. या इंजिनातील अतिरिक्त झडप(व्हॉल्व्ह) स्कूटरची कामगिरी आणखी दमदार करत तिला 95 kmph एवढ्या सर्वोच्च वेगाची क्षमता देते. याशिवाय TVS NTORQ 125 मध्ये अनोखा एग्झॉस्टनोटही बसवलेला आहे.
कनेक्टेड तंत्रज्ञान
TVS SmartXonnect* या कल्पक ब्ल्यूटूथ एनेबल्ड तंत्रज्ञानाने युक्त असलेली TVS NTORQ 125 ही पहिलीच स्कूटर असून तिला एनटीओआरक्‍यू मोबाइल अॅप या अनोख्या मोबाइल अॅप्लिकेशनची जोड आहे. हे अॅप गुगल प्‍ले स्‍टोअरवरून डाऊनलोड करता येते. TVS SmartXonnect* मुळे स्कूटरमध्ये अनेक सुविधा प्रथमच उपलब्ध झाल्या आहेत. गाडीचे स्पीडोमीटर पूर्णपणे डिजिटल असून यामध्ये नेव्हिगेशन असिस्ट, टॉप सीड रेकॉर्डर, इन-बिल्ट लॅप-टायमर, फोन बॅटरीचा स्ट्रेंथ डिसप्ले, गेल्यावेळी स्कूटर कुठे पार्क केली होती हे दाखवणारी सुविधा, सर्व्हिसिंगची आठवण करून देण्याची सुविधा, ट्रिपमीटर आणि रस्त्यासाठी तसेच शर्यतीसाठी मल्टि-राइड स्टॅटेस्टिक्स मोड्स अशा 55 सुविधा आहेत.
 
आराम, सुरक्षितता आणि सोय
चालवणाऱ्याच्या आरामावर तसेच सुरक्षिततेवर सर्वाधिक लक्ष देऊन TVS NTORQ 125 विकसित करण्यात आली आहे. या स्कूटरला अधिक मजबूत अशी 110x80x12 आकारमानाची ट्युबलेस टायर्स देण्यात आली आहेत. त्याबरोबरच अत्यंत सूक्ष्म सस्पेन्शन आणि कमीतकमी अंशात वळण्याची क्षमता (टर्निंग रेडिअस) यामुळे सर्व प्रकारच्या पृष्ठभागांवर चालण्यासाठी ती उत्तम आहे. ही स्कूटर चालवण्याचा अनुभव अधिक उत्तम व्हावा यासाठी पास बाय स्विच, दोन्ही बाजूंनी स्टीअरिंग लॉक, पार्किंग ब्रेक्स आणि इंजिन किल स्विच अशा सुविधा यात देण्यात आल्या आहेत. वापर सुलभ व्हावा म्हणून TVS NTORQ 125 मध्ये बाह्य इंधनटाकी, यूएसबी चार्जर, आसनाखाली सामान ठेवण्यासाठी मोठी जागा आणि टीव्हीएस कडेपेटंट असलेला ईझेड सेंटर स्टॅण्ड अशा सोयी आहेत. ही स्कूटर सध्‍या चालवणाऱ्याची सुरक्षितता ध्यानात घेऊन डिस्‍क प्रकारांत उपलब्ध आहे.
अनोख्या डेटाइम रनिंग लॅम्प्स(डीआरएल)ने युक्त असलेली TVS NTORQ 125 मॅट यलो, मॅट ग्रीन, मॅट रेड व मॅट व्हाइट या रंगांमध्ये उपलब्ध आहे. यामध्‍ये क्षेत्रातील 30 सर्वोत्‍तम वैशिष्‍ट्ये आहेत. TVS NTORQ 125 स्‍कूटर 60,950 रुपयांमध्‍ये ( एक्सशोरूम गोवा, ) उपलब्‍ध असेल.
अधिक माहितीसाठी कृपया www.tvsntorq.com  इथे भेट द्या.