‘टीका उत्सव’ स्तुत्य उपक्रम..!

0
808
देशात धुमाकूळ घालत असलेला कोरोना गोव्यातही धोक्याच्या उंबरठ्यावर येऊन उभा आहे. आपण जबाबदार नागरिक या नात्याने वागलो नाही तर कोरीनारुपी राक्षस आपल्याला गिळंकृत करण्यासाठी आपली परवानगी मागत बसणार नाही. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि आरोग्य खात्याच्या दीर्घ अनुभव असलेले आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी हा धोका ओळखून युद्ध पातळीवर उपाययोजना हाती घेतल्या.
सरकारने राज्यातील दोन्ही जिल्हा इस्पितळासह उप जिल्हा इस्पितळे, प्राथमिक आरोग्य केंद्रे याठिकाणी सुसज्ज यंत्रणा तैनात ठेवली. राज्यातील सध्यस्थिती पाहता कोरोणाने आपले अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. तरीही डगमगून न जाता आरोग्यमंत्री राणे रात्रंदिवस काम करताना दिसत आहे. सरकार आपल्या पातळीवर काम करत असताना त्यांना भाजपच्या यंत्रणेचे मोठे साहाय्य मिळत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट – तानावडे यांच्या कुशल नेतृत्वाखाली भाजपचे संघटन उत्कृष्टपणे काम करताना दिसत आहे. यासाठी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट – तानावडे आणि संघटन मंत्री सतीश धोंड यांचे कौतुक करावेच लागेल.
6 एप्रिल रोजी भाजपने आपला स्थापना दिन साजरा केला. यानिमित्त संपूर्ण देशभर कोरोना लसीकरणाची जनजागृती करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पक्षाच्या नेत्यांसह तळागाळातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पंतप्रधान मोदींनी कोरोना लसीकरणाची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्याचे आवाहन केले. तसेच सर्व राज्यांनी लसीकरण मोहीम ‘ टिका उत्सव ‘ म्हणून हाती घेण्याचे आवाहन केले होते.
यावर गोवा सरकारने तातडीने कार्यवाही करुन राज्यभर टिका उत्सवाचे यशस्वी आयोजन केले.
राज्यात पूर्वीपासून उपलब्ध असलेल्या आरोग्य केंद्रासह आणखी 22 केंदे तातडीने सुरू करून कोरोना लसीकरण मोहिमेस वेग देण्यात आला. राज्यभरातून उत्तम प्रतिसाद मिळाल्याने राज्य सरकारने ही मोहीम 30 एप्रिल पर्यंत राबवण्याचे ठरवले. केवळ 5- 6दिवसात अंदाजे 50 हजारपेक्षा अधिक लोकांनी कोरोनाची लस टोचून घेतली. आत्तापर्यंत राज्यातील सुमारे 2 लाखांपेक्षा अधिक लोकांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे. ही गती अशीच राहिली आणि लोकांनी सरकारच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देऊन लस टोचून घेतली तर 30 एप्रिल पर्यंत लस टोचून घेतलेल्यांचा एकूण आकडा साडे चार लाखांच्या पुढे जाईल. ही बाब लोकांसाठी दिलासादायक असेल. किमान 40 टक्के लोकांचे लसीकरण झाले तरी हर्ड इमुनिटी तयार होऊन कोरोना आटोक्यात आणता येईल. गोव्याच्या लोकसंख्येचा विचार करता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 40 ते 50 टक्के लोकांचे लसीकरण व्हावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. लोकांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता आणि मनात कोणताही कींतू न बाळगता लस टोचून घ्यायला हवी.
मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री या सर्व घडामोडींवर लक्ष ठेऊन आहेत. एकीकडे राज्यातील आर्थिक व्यवहार सुरू राहिले पाहिजेत आणि दुसरीकडे कोरोनाही वाढला नाही पाहिजे यासाठी सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करताना दिसत आहे. विरोधक यावर टीका करत असले तरी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री धीरोदात्तपणे सर्वांना तोंड देत काम करत असल्याचे दिसून येत आहेत. लॉकडाऊन सारखा टोकाचा निर्णय घेतल्यास त्याचे गंभीर परिणाम सर्वानाच भोगावे लागतील याची जाणीव असल्याने सरकार सावधपणे पावले टाकत आहे.
दिल्लीसह शेजारी राज्यात लॉकडाऊन घोषित केल्याने पर्यटकांची संख्या कमी झाली तरी स्थानिक आर्थिक व्यवहार, बाजारी उलाढाल आणि उद्योग धंदे तरी सुरू राहिले पाहिजेत म्हणून राज्यात लॉकडाऊन करणार नाही अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी घेतली हे चांगलेच झाले.
कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारच्या या प्रयत्नात भाजपच्या संघटनेचे मोलाचे योगदान लाभत आहे. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट – तानावडे आणि संघटन मंत्री सतीश धोंड यांच्या नेतत्वाखाली पक्षाचे संघटन अव्याहतपणे काम करत आहे. पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक लासिकरणविषयी जनाजगृती करत आहेत. जागोजागी जागृती कार्यक्रम घेतले जात असून प्रसंगी लोकांना लसीकरण केंद्रापर्यंत नेण्याची आणि आणण्याचे काम कार्यकर्ते करत आहेत. आणि हीच सरकारच्या जमेची बाजू आहे.
कोरोनाला हद्दपार करण्यासाठी राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नात लोकांनीही सहभागी व्हायला हवे. मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि भाजप प्रदेशध्यक्ष वारंवार लोकांना आवाहन करत आहेत. याला प्रतिसाद देत पात्र असलेल्या सर्व नागरिकांनी कोरोना लस घ्यावीच शिवाय त्याच्या सुरक्षेविषयी दुसऱ्यांनाही माहिती द्यावी. एक जबाबदार नागरिक या नात्याने एवढे तरी आपण नक्की करू शकतो.
संदेश साधले, भाजपा माध्यम विभाग प्रमुख