टीका उत्सवातुन भाजपचे संधीसाधू राजकारण उघड : अमरनाथ पणजीकर 

0
155
गोवा खबर : कोविड लॉकडाऊन काळात लोकांच्या “आजाराचा बाजार” करणाऱ्या भाजपचा “संधीसाधू राजकारणाचा” चेहरा यंदा टीका उत्सवातुन उघड झाला आहे अशी टिका कॉंग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.
बेजबाबदार भाजप सरकारने निवडणूक आचारसंहितेचा भंग करुन नगरपालीका प्रभागात कोविड लसीकरणाची शिबीरे आयोजित केली आहेत.  आश्चर्याची  बाब म्हणजे या लसीकरण शिबीराची भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते स्वताचे फोटो घालुन जाहिरातबाजी  करीत असुन, भाजपचे संधीसाधू राजकारण यातुन उघड होत आहे.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी नेहमीच ” संधीसाधू राजकारण” केले. त्यांचाच वारसा आपण पुढे नेत असल्याचे विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कालच जाहिर केले आहे. भाजपला लोकांच्या भावना व वेदना यांचे काहिच पडलेले नसुन, आपल्या राजकीय फायद्यासाठी ते लोकांच्या आरोग्याकडे खेळ करुन प्रसिद्धी मिळवीण्याचा डाव खेळत आहेत असे अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे.
गेल्यावर्षी कोविड महामारीच्या सुरूवातीला, योग्य खबरदारी घेण्याचे सोडुन पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप ” उत्सव” साजरे करण्यात व्यस्त होते. लोकांना “टाळी वाजवा थाळी वाजवा दिवे लावा” असे सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोरोना १८ दिवसात गायब होणार असल्याची आपल्या खास जुमला शैलीत घोषणा केली होती याची आठवण अमरनाथ पणजीकर यांनी करुन दिली आहे. दुर्देवाने भाजपच्या कारनाम्याचा काहीच फायदा झाला नाही व लोक आजही त्याचे परिणाम भोगत आहेत असे त्यांनी पुढे सांगीतले.
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी ताबडतोब भाजपच्या राजकीय लसीकरण मोहीमेस लगाम घालावा व टिका उत्सव शिबीरांत राजकीय हस्तक्षेप बंद करावा. गोव्यातील चाळीसही आमदारांना विश्वासात घेवुन एक योग्य कृती आराखडा तयार करुन कोविड लसीकरण मोहिम राबवावी अशी मागणी अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.