टाळेबंदी काळात कपात न करता वेतन देण्याचे एनईसीचे मालकांना निर्देश

0
665

गोवा खबर:उद्योग किंवा दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांच्या सर्व मालकांनी, त्यांच्या कामाच्या ठिकाणी काम करणार्‍या कामगारांना लॉकडाऊन दरम्यान त्यांचे आस्थापन बंद असतानाच्या कालावधीत त्यांच्या वेतनात कोणतीही कपात न करता ठरलेल्या वेळेत त्यांचे वेतन द्यावे असे राष्ट्रीय कार्यकारी समितीने निर्देश दिलेले आहेत.

जेथे कामगार, स्थलांतरितांसह, भाड्याने राहत आहेत, त्या घरमालकांनी एका महिन्याचे भाडे देण्याची मागणी करू नये असेही निर्देश त्या घरमालकांना दिलेले आहेत. उपरोक्त मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणे हा आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत फौजदारी गुन्हा आहे आणि उल्लंघन करणार्‍यास संबंधित तरतूदीअंतर्गत शिक्षा देण्यात येईल असेही नमूद करण्यात आले आहे.

मुख्य सचिव श्री. परिमल रॉय यांच्या अध्यक्षतेखालील राज्य कार्यकारी समितीने असे निर्देशित केले आहे की, जर कोणताही मालक त्याच्या कर्मचार्‍यांना काढून टाकत असेल किंवा कोणताही घरमालक अशा मजुरांवर किंवा विद्यार्थ्यांवर घर खाली करण्यासाठी दबाव आणत असेल, किंवा उपरोक्त कोणत्याही सूचनेचे उल्लंघन करीत असेल, तर तो वरील आदेशाचा भंग करीत असून, तो कठोर कारवाईस पात्र ठरेल.