टपाल विभागातर्फे २ ते ४ आक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रम

0
908

गोवा खबर:भारतीय टपाल गोवा विभागातर्फे २ ते ४ आक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीदिनानिमित्त आयोजित या तीन दिवसीय  कार्यक्रमात महात्मा गांधी यांच्यावर आधारित टपाल तिकिटांचे प्रदर्शन, शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा तसेच टपाल तिकीट संग्रहाबाबत कार्यशाळा या गोष्टींचा समावेश आहे.

पणजी स्थित गोवा मनोरंजन संस्थेच्या आवारातील मॅकिनेझ पॅलेस येथे टपाल तिकिटांचे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी सकाळी १० ते संध्याकाळी ६ यावेळेत पाहण्यासाठी खुले राहील. या प्रदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन गोवा टपाल विभागाने केले आहे.