टपाल विभागातर्फे पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन

0
1047

 

 

 गोवा खबर:भारतीय टपाल विभागातर्फे राष्ट्रीय पातळीवर २०१८-१९ या वर्षातील ‘ढाई आखर पत्र लेखन स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे.   ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत ही स्पर्धा आहे.

 

या स्पर्धेचा विषय रवींद्रनाथ टागोरांच्या ‘आमार देशेर माटी’ वरून प्रेरीत आहे. स्पर्धक हे पत्र इंग्रजी, हिंदी किंवा आपल्या स्थानिक भाषेत लिहू शकतात व मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई – ४००००१ यांच्या नावे पाठवू शकतात.

 

या स्पर्धेसाठी पुढीलप्रमाणे श्रेण्या करण्यात आल्या आहेत :-

 

  • वयवर्षे १८ पर्यंत

  1. अंतर्देशीय पत्र श्रेणी (शब्द मर्यादा ५००)

  2. पाकीट श्रेणी (शब्द मर्यादा १०००)

           2. वयवर्षे १८ पेक्षा अधिक

  • अंतर्देशीय पत्र श्रेणी (शब्द मर्यादा ५००)

  • पाकीट श्रेणी (शब्द मर्यादा १०००)

 

पारितोषिक श्रेणी :-

 

महाराष्ट्र व गोवा विभाग स्तर :-

 

प्रथम क्रमांक : २५ हजार

द्वितीय क्रमांक : १० हजार

तृतीय क्रमांक : ५ हजार

 

राष्ट्रीय स्तर :-

 

प्रथम क्रमांक : ५० हजार

द्वितीय क्रमांक : २५ हजार

तृतीय क्रमांक : १० हजार

या स्पर्धेसाठी पत्र पाठवताना स्पर्धक A4 मापाच्या कागदावर लिहून पाठवू शकतात. या स्पर्धेसाठी पत्र हस्ताक्षरात पाठवायची आहेत. या स्पर्धेसाठी अंतर्देशीय पत्रे व योग्य टपाल तिकीट लावलेली पाकिटेच ग्राह्य धरण्यात येतील.

 

याशिवाय स्पर्धकांनी वयाचा दाखला/पुरावा म्हणून पत्रावर ‘’१ जानेवारी २०१८ रोजी मी वयवर्षे १८ च्या वर/ च्या खाली असल्याची खात्री देतो/देते.’’ असा उल्लेख करणे अपेक्षित आहे.

 

पत्राच्या पाकिटावर ‘’ ढाई आखर पत्र ‘’ असा उल्लेख करावा. अधिक माहितीसाठी कृपया www.indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा ०८३२- २२६२४५०/८८१/८८३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.