टपाल विभागातर्फे टपाल तिकीट रचना स्पर्धा

0
528

 गोवा खबर:टपाल विभागाने एक ‘टपाल तिकीट रचना (छायाचित्रण) स्पर्धा’ आयोजित केली आहे. ‘भारतातील यूनेस्को जागतिक वारसा स्थळे (सांस्कृतिक)’ या संकल्पनेवर ही स्पर्धा आधारित आहे. 2020 सालातील स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या हेतूने आयोजित ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर 7 जुलै रोजी MyGov पोर्टलवरून सुरू करण्यात आली आहे.

देशाच्या सर्व भागातील व सर्व वयोगटातील लोक या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात.  यासाठी स्पर्धकांनी स्वत: काढलेले छायाचित्र MyGovच्या https://www.mygov.in/task/design-stamp-themed-unesco-world-heritage-sites-india-cultural/ या पोर्टलवर द्यावीत.

या स्पर्धेसाठी छायाचित्र पाठविण्याचा अंतिम दिनांक 27 जुलै 2020 आहे. जिंकणाऱ्या छायाचित्रांचा उपयोग टपाल तिकीट तयार करण्यासाठी केला जाईल व या टपाल तिकीटांचे येणाऱ्या स्वातंत्र्य दिनी लोकार्पण होईल.