गोवा खबर:भारतीय टपाल विभागातर्फे आंतरराष्ट्रीय पातळीवर २०२० या वर्षातील पत्र लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वयवर्ष १५ पर्यंतच्या वयोगटाची स्पर्धा रविवार, दिनांक १ मार्च २०२० रोजी पणजीमध्ये घेण्यात येईल. सकाळी १० ते ११ असा एक तासाचा अवधी यासाठी असेल. यासाठीचे अर्ज शाळेमर्फत पोस्टमास्तर जनरल, गोवा विभाग, पणजी यांना दिनांक २५ फेब्रुवारी २०२० पर्यंत द्यावेत, असे आवाहन टपाल विभागाकडून करण्यात आले आहे. स्पर्धास्थान लवकरच कळविण्यात येईल.
या स्पर्धेचा विषय ‘ज्या जगात तुम्ही राहत आहात, त्याबद्दल एका प्रौढास संदेश लिहा’ असा आहे. स्पर्धक या विषयावरील पत्र इंग्रजी, हिंदी किंवा आपल्या स्थानिक भाषेत लिहू शकतात. यासाठी शब्दमर्यादा ८०० इतकी आहे. व मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई – ४००००१ यांच्या नावे पाठवू शकतात.
पारितोषिक श्रेणी :-
राष्ट्रीय स्तर :-
प्रथम क्रमांक (एक) : रुपये ५ हजार व प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक (एक) : रुपये ३ हजार व प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक (एक) : रुपये २ हजार व प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ (प्रत्येक टपाल कार्यालय क्षेत्रातील एक सर्वोत्तम पत्राला) : रुपये १ हजार व प्रमाणपत्र
राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम स्पर्धकाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी अधिकृत भारतीय स्पर्धक म्हणून प्रवेश मिळेल.
अधिक माहितीसाठी कृपया www.indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.