टपाल विभागाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच बँकींग सेवा

0
330

 

गोवा खबर:सध्या सुरु असलेले लॉकडाऊन लक्षात घेऊन गोवा टपाल विभाग ज्येष्ठ नागरिकांसाठी आधारप्रणीत घरपोच बँकींग सेवा सुरु करणार आहे. पणजी आणि म्हापसा भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सेवा सुरु करण्यात येईल. या सेवेअंतर्गत कोणत्याही शेड्युल्ड वा राष्ट्रीयकृत बँकेच्या खातेधारकांना 10,000 रुपयांपर्यंत रक्कम काढण्याची सुविधा प्राप्त होणार आहे.

या सेवेचा लाभ घेणाऱ्यांनी 1800 313 6633 (टोल फ्री) आणि 8825547139, 7338975549 या क्रमांकावर संपर्क साधून आपला पत्ता, संपर्क क्रमांक आणि किती रक्कम काढायची आहे, याचा तपशील द्यावा. यासाठी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत सकाळी 10 ते दुपारी 01 वाजेदरम्यान संपर्क साधावा आणि आधारकार्ड तयार ठेवावे. टपाल विभागाचा कर्मचारी व्यवहारादरम्यान COVID-19 संदर्भातील सर्व सूचना लक्षात घेऊन आणि सामाजिक अंतर राखून काम करेल.