झी युवावर १० फेब्रुवारीला मनोरंजनाचा ‘महारविवार ‘

0
1125

 

 

गोवा खबर:मनोरंजनाचे दुसरे नाव म्हणजे झी युवा वाहिनी. आजवर या वाहिनीने अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम दाखवून महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे येथेछ मनोरंजन केले आहे. सध्या प्रेक्षकांना घरी बसून नियमितपणे सोमवार ते शनिवार ७ ते १० च्या दरम्यान रोज संध्याकाळी तू अशी जवळी राहा ,सूर राहू दे , वर्तूळ , वाजता फुलपाखरू , आम्ही दोघी आणि  अप्सरा आली असे कार्यक्रम झी युवावर पाहण्याचे  ठरलेले असते . मात्र रविवारी काय करावं हे त्यांना कळत नसतं. मग उगाच रीमोटचा चाळा करत हे प्रेक्षक जे मिळेल ते पाहतात आणि स्वतःचे मनोरंजन करतात . याच गोष्टीचा विचार करुंन या रविवारी झी युवा घेऊन येतंय मनोरंजनाचा महारविवार .

 

१० फेब्रुवारीची संध्याकाळ ही मनोरंजनाचा महारविवार म्हुणून  यापुढे ओळखली जाईल . या महा रविवारची सुरुवात संध्याकाळी ७ वाजता तू अशी जवळी राहा या राजवीर आणि मनवा  यांच्या अनोख्या प्रेमकहाणीने होईल . त्यांनतर रात्री ८ वाजता फुलपाखरू मालिकेतील मानस आणि वैदेही च्या बाळाच्या बारश्याचा महत्वाचा प्रसंग आपल्याला पाहायला मिळेल . त्यांनतर रात्री ९ वाजता  अभि आणि मीनाक्षी  यांच्या आयुष्यातील अनपेक्षित कलाटणी असलेली  मालिका वर्तूळ प्रेक्षकांना पाहायला मिळेल . सध्या या तिन्हीही मालिका प्रेक्षकांमध्ये अतिशय प्रचंड प्रसिद्ध असल्यामुळेच झी युवा वाहिनी १० फेब्रुवारीला  ‘मनोरंजनाचा महारविवार ‘ प्रेक्षकांच्या आग्रहातर दाखवत आहे .

 

७ वाजता तू अशी जवळी राहा या मालिकेमध्ये राजवीर आणि त्याचे मनवावर असलेले वेडे प्रेम आपल्याला पाहायला मिळते . सिद्धार्थ बोडके आणि तितिक्षा तावडे हे दोघे या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये आहेत . राजवीर मनवावर एवढं प्रेम करतोय की तिच्या आयुष्यातील दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीचा सहवास सहन होत नाही आहे . अगदी तिचं कुटुंब सुद्धा त्याला नको आहे  मात्र मनवा त्याच्यावर करत असलेल्या प्रेमापोटी तो जमेल तितकं सगळ्या गोष्टी सांभाळत आहे . महारविवारी मनवा चा डान्स परफॉर्मन्स आणि त्यानंतर होणाऱ्या नाट्याची मजा अनुभवायला मिळणार आहे .

 

८ वाजता फुलपाखरू मालिकेतील मानस आणि वैदेही या दोघांच्या महाविद्यालयीन प्रेमापासून आता लग्न आणि त्यानंतर झालेल्या बाळाची कथा  सांगण्यात आली आहे . यशोमान आपटे आणि हृता दुर्गुळे हे दोघे या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत .या महारविवारी आपल्याला मानस  वैदेहीच्या  बारशाची तयारी  , बाळाचं नाव  आणि  मानस वैदही च स्वप्नातील गाणं आपलयाला पाहायला मिळणार आहे  . मानस आणि वैदेहीने आपलं बाळ शाल्मलीला देण्याचा निर्णय आणि हे दोघे आपलं बाळ शाल्मली ला देणार का याबद्दलची उत्कंठा आपल्याला  पाहायला मिळेल .

 

९ वाजता वर्तूळ मालिकेतील मीनाक्षी तिला असलेला एक वाईट भूतकाळ  म्हणजेच विक्रम आणि अभिच्या दृष्टीने भविष्यात येणारी सुखाची चाहूल या अतिशय उत्कृष्ट कथानकेवर ही मालिका पुढे सरकते . विकास पाटील , विजय आंदळकर आणि जुई गडकरी यांच्या या  मालिकेत मुख्य भूमिका आहेत . अभि आणि मिनाक्षीचं लग्न आणि त्यात विक्रम एन्ट्री करणार का ?  हा सध्याच्या मालिकेमधील महारविवार आपलयाला पाहायला मिळेल. संगीत ,हळद आणि मग लग्न यातील गम्मत जमत प्रेक्षक अनुभवतील . या एपिसोड मध्ये झी युवा वाहिनीवरील इतर कलाकार सुद्धा तुम्हाला वर्तूळ मालिकेतील या भव्य लग्नात दिसतील . आणि त्याचबरोबर विक्रम चा थरार आणि कथानकात होणारे ट्विस्ट प्रेक्षकांना मालिकेत अडकवून ठेवेल .

या तिन्ही मालिका सध्या मनोरंजनाने भरलेल्या असून हा महारविवार प्रेक्षकांना आवडेल यात शंकाच नाही . झी युवा वाहिनीवरील सर्व कार्यक्रम बघत राहण्यासाठी ३९ रुपयांचा ‘ झी फैमिली पॅक’   नक्की निवडा…या मध्ये तुमचे मनोरंजन करण्याऱ्या २० झी वाहिन्या आपल्याला पाहायला मिळतील. आणि मनोरंजनाचा महारविवर १० फेब्रुवारीला झी युवावर पाहायला चुकूनही विसरू विसरू नका.