ज्ञान प्राप्त करण्यापासून कोणीहू दूर राहू नये : कवळेकर

0
398

गोवा खबर:कोणत्याही व्यक्तीने ज्ञान, शिक्षण आणि आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर अनुभव संपादन करण्यापासून दूर राहू नये कारण मिळविलेले ज्ञान कधीही वाया जात नाही तर आयुष्याच्या उन्नतीसाठी कार्य करते असे उपमुख्यमंत्री श्री. चंद्रकांत (बाबू) कवळेकर म्हणाले.

 केपें येथील डॉन बॉस्को वोकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट येथे इलेक्ट्रिशियन आणि डेस्कटॉप पब्लिशिंग कोर्सच्या निरोप समारंभात श्री कवळेकर बोलत होते. गृह विभाग (एनआरआय कक्ष) परदेशिय रोजगार अभ्यासक्रम आणि कौशल्य उन्नतीकरण कार्यक्रमांतर्गत गोव्याच्या परदेशी रोजगार एजन्सीद्वारे हा कोर्स पुरस्कृत केले जातात.

 पुढे बोलताना  कवळेकर म्हणाले की प्रत्येक बेरोजगार नागरिकांसाठी सरकारने वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला आहे. शासनाच्या विविध योजना, अनुदान आणि सुविधांचा लाभ घेण्यासाठी एखाद्याने केवळ पुढे आले पाहिजे. आजच्या समाजाच्या गरजा भागविण्यासाठी इलेक्ट्रिशीयन, प्लंबर, मोटर मॅकॅनिक सारख्या कुशल कामगारांची गरज आहे आणि सरकारी प्राधिकरणाच्या मोफत वर्गांचा युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कवळेकर यांनी केले.

एनआरआय आयुक्त आणि गोव्याच्या परदेशी रोजगार एजन्सीचे अध्यक्ष  नरेंद्र सावईकर म्हणाले, कौशल्य विकास अत्यंत महत्वाचा आहे  आणि हे उद्दीष्ट लक्षात ठेवून आपली एजन्सी त्या दिशेने काम करीत आहे. एखाद्याने स्वत: च्या पायावर उभे राहून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनले पाहिजे असे  सावईकर म्हणाले. जवाबदारीसह कोर्स यशस्वीरित्या आयोजित करण्यासाठी पूर्ण सहकार्य केल्याबद्दल त्यांनी डॉन बॉस्को संस्थेचे आभार मानले.

 

 डॉन बॉस्को संस्थेचे संचालक, फादर मायकल डीकॉस्ता आपल्या स्वागतपर भाषणात म्हणाले, आपली संस्था कौशल्य प्रशिक्षणासाठी नेहमीच पुढे असते आणि सरकारच्या सहकार्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपला अनुभव कथन केला व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. केपे नगरपालीकेचे नगरसेवक श्री पावलो फर्नांडीस कार्यक्रमास उपस्थित होते.