जॉन आगियार यांना निरोप

0
201

 

गोवा खबर: माहिती आणि प्रसिध्दी खात्याचे अधिकारी  जॉन आगियार हे माहिती खात्यातून आपल्या ३० वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झाले आहेत. १९९० साली माहिती साहाय्यक म्हणून सदर खात्यात ते रूजू झाले होते. या  कालावधीत त्यांनी पोलीस खात्यात जनसंपर्क अधिकारी म्हणूनही  काम केले आहे.

     यावेळी बोलताना माहिती संचालिका  मेघना शेटगांवकर यांनी त्यांच्या समर्पित कार्याची प्रशंसा केली. नवीन कामाच्या संधीसाठी ते नेहमी तत्पर असायचे. समाजातील प्रत्येकांकडे त्यांचे चांगले संबंध होते.  आगियार आपल्या स्वच्छ कारकीर्दीने आज निवृत्त होत आहे ही अभिमानाची बाब असल्याचे त्या म्हणाल्या.  शेटगांवकर यांनी त्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.    

माहिती अधिकारी  प्रकाश नाईक यांनी  जॉन आगियार यांनी विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली आणि कठोर परिश्रम, समर्पितवृत्ती ही यशाची गुरूकिल्ली आहे आणि ती वृत्ती आगियार यांच्याकडे आहे.

     आगियार यांनी आपल्या जुन्या आठवणीचे स्मरण करून खात्यातील इतर कर्मचा-यांना एकता आणि शिस्तीने काम करण्याचा सल्ला दिला.