जैवविविधता संवर्धन पुरस्कार २०२० जाहीर

0
272
गोवा खबर:गोवा राज्य जैवविविधता मंडळातर्फे जैवविविधता, परिस्थितीशास्त्र व पर्यावरण यांच्या संवर्धनात दिलेल्या आदर्श योगदानाचा गौरव करण्यासाठी, गोवा सरकारच्या “गोवा राज्य जैवविविधता संवर्धन पुरस्कार, वर्ष २०२०” जाहीर करण्यात आले आहेत. हे पुरस्कार दोन विभागांत देण्यात येतील, उत्कृष्ट जैवविविधता व्यवस्थापन समिती (बीएमसी), उत्तर व दक्षिण गोव्यासाठी प्रत्येकी एक, ५० हजार रुपये पुरस्कार रकमेसह आणि वैयक्तिक विभागात,  २५ हजार रुपये पुरस्कार रकमेसह, उत्तर व दक्षिण गोव्यात प्रत्येकी एक. याव्यतिरिक्त, ४ बीएमसींना प्रत्येकी १० हजार रूपयांचे आणि ४ व्यक्तींना प्रत्येकी ५ हजार रूपयांचे विशेष गौरव पुरस्कार देण्यात येतील. पुरस्कार विजेत्यांची सूची पुढीलप्रमाणे 
जैवविविधता व्यवस्थापन समिती (बीएमसी) विभागात (पुरस्कार रक्कम प्रत्येकी  ५० हजार रुपये), उत्तर गोव्यातून आगरवाडा चोपडे बीएमसीची निवड करण्यात आली आहे. आपल्या गावात जन जैवविविधता नोंदवही तयार करणे, गावातील संभाव्य जैवविविधता वारसा स्थळांची निवड करण्यासाठी केलेले प्रयत्न, स्थानिक जैवविविधतेचे ज्ञान असलेल्या जाणकारांची, भागधारकांची व तज्ज्ञांची माहिती काढणे यासाठी, बीएमसी समुह सदस्यांनी आणि उत्साही विद्यमान अध्यक्ष  सीताराम पी. राऊत व माजी बीएमसी अध्यक्ष  सुमन सीताराम खोर्जुवेकर यांनी दिलेले योगदान यासाठी बीएमसीने घेतलेल्या प्रयत्नांकरिता हा पुरस्कार देण्यात येत आहे.
पारंपरिक व्यवसायांचे संवर्धन करण्यासाठी व त्यांना पुन्हा चालना देण्यासाठी बीएमसीने अगदी तळागाळाच्या स्तरावर अथक प्रयत्न केले आहेत, ज्यामध्ये, आगरवाडा चोपडे येथील मुख्य खजिना असलेल्या मीठागारांच्या संवर्धनासाठी राबविलेल्या संवर्धन उपक्रमाचा समावेश आहे आणि स्थानिक शेतकर्‍यांना जैवविविधतेचे स्थानिक टॅगिंग व ब्रँडिंग करण्यासाठी मदत करणे हा स्तुत्य उपक्रम असून त्याद्वारे स्थानिक शेतकर्‍यांच्या उपजीविकेला हातभार लाभेल. तसेच, कोविड १९ महामारीच्या काळात, गरजू व्यक्तींना अन्न, किराणा, भाज्या व मास्क पुरविण्यासाठी दिलेल्या पूर्ण सहकारासाठी व आदर्श सेवेसाठी बीएमसी विशेष गौरवासाठी पात्र आहे.
दक्षिण गोव्यातून, श्रीस्थळ बीएमसीला पुरस्कार प्राप्त झाला आहे.  आपल्या गावात जन जैवविविधता नोंदवही तयार करणे, गावातील ‘घोड्यापायक – गुळे’ या स्थळाला जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यासाठी केलेले प्रयत्न, स्थानिक जैवविविधतेचे ज्ञान असलेल्या जाणकारांची, भागधारकांची व तज्ज्ञांची माहिती काढणे यासाठी, बीएमसी समुह सदस्यांनी आणि उत्साही अध्यक्ष श्री. विनय तुबकी यांनी दिलेले योगदान यासाठी बीएमसीने घेतलेल्या प्रयत्नांकरिता हा पुरस्कार देण्यात येत आहे.
पारंपरिक व्यवसायांना पुन्हा चालना देण्यासाठी बीएमसीने अगदी तळागाळाच्या स्तरावर अथक प्रयत्न केले आहेत. तसेच, कोविड १९ महामारीच्या काळात, काणकोण तालुक्याच्या मामलेदारांनी, घरोघर सर्वेक्षणासाठी आणि गरजू व्यक्तींना अन्न, पुरविण्यासाठी, विशेषत: काणकोण तालुक्यात अडकून पडलेल्या स्थलांतरितांना, दिलेल्या पूर्ण सहकारासाठी व आदर्श सेवेसाठी बीएमसी विशेष गौरवासाठी पात्र आहे.
विशेष गौरव (बीएमसी विभाग) पुरस्कार (रक्कम प्रत्येकी १० हजार रुपये) हणजुणे कायसुव बीएमसीला त्यांच्या संवर्धन उपक्रमांमधील व वृक्षारोपण उपक्रमांमधील सहभागासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. चोडण माडेल बीएमसीच्या स्थानिक दक्षतेमुळे उल्लंघनाच्या घटना उघडकीस आल्या आणि त्यांच्या जीएसबीबीच्या कार्यक्रमांमधील सहभागामुळे त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. कुर्टी खांडेपार बीएमसीला पीबीआर केंद्रित एक भाग म्हणून झरा व जलाशयाच्या कायाकल्पासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
चिखली बीएमसीलाही शिंपल्याच्या वापराच्या अतिरेकावर नियंत्रण ठेवण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पणजी महानगरपालिका बीएमसीला जीएसबीबीतर्फे, शहरी जैविविधता इंडेक्स तयार करणारी व पीबीआर प्राप्त संवर्धन दृष्टिकोन असलेले पहिले पालिका क्षेत्र म्हणून विशेष गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
वैयक्तिक विभागात (पुरस्कार रक्कम रु.२५ हजार रुपये) सूर्यकांत गावकर (उत्तर गोवा) यांना, त्यांच्या जैवविविधतेच्या संवर्धन कामातील सहभागासाठी व उत्कृष्ट जैवविविधता दस्तऐवजीकरणासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी नैसर्गिक रंग तयार केले आहेत व होळीच्या वेळी रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक रंग वापरण्याचा ते प्रसार करतात. जानू गावकर (दक्षिण गोवा) यांनाही या विभागात पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना पारंपरिक वैद्यकीय व्यवसायाचा मोठा अनुभव आहे व ते त्यांच्या आदिवासी गावात व शेजारील गावांमध्ये नि:स्वार्थपणे सेवा बजावत आहेत. पारंपरिक वनस्पती व प्राण्यांची त्यांना माहिती आहे. त्यांना स्त्रीरोगांविषयीचे ज्ञान असून त्यांनी खोतीगाव, काणकोण येथील दुर्गम भागांमध्ये कठीण प्रसूतींमध्ये मदत केली आहे. त्यांना प्राण्यांचे रोग व त्यावरील उपचारांचीही माहिती आहे.
विशेष गौरव (वैयक्तिक) विभागात (पुरस्कार रक्कम प्रत्येकी ५ हजार रुपये), पर्यावरण, जैवविविधता क्षेत्रातील किंवा त्याच्या पारंपारिक ज्ञान क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल  अंकुश उत्तम बगळी, आगरवाडा, पेडणे;  आग्नेल फर्नांडिस, नेरुल, बार्देश;  शिरीष गोपाळकृष्ण पै, श्रीस्थळ काणकोण;  ओंकार धारवाडकर, फोंडा यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
बीएमसी सचिवांसाठी विशेष गौरव पुरस्कार (प्रत्येकी  ५ हजार रुपये), संदीप देसाई (श्रीस्थळ बीएमसी), विनोद शिंदे (बार्शे खेडे बीएमसी),  गोकुळदास कुडाळकर (कुर्टी- खांडेपार बीएमसी), रवींद्र वाडीकर (शेल्डे बीएमसी), आशा मेस्ता (चिकळोण बोगमाळो बीएमसी),  आल्विटो डीसिल्वा (पोंफुर्बा वळावली बीएमसी),  गणपत सिधये (पीडीएफ बीएमसी),  सुशांत नाईक (तिवरे वरगांव बीएमसी),  प्रजानन नाईक (सुर्ला बीएमसी),  मुकुंद उक्शेकर (वारखंड नागझर बीएमसी),  संजीत रॉड्रिग्ज (सीसीपी बीएमसी) आणि  लेन्सी डायस (कुडका बांबोळी) यांना जाहीर झाला आहे.
जैवविविधता क्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष निवड (फक्त प्रमाणपत्रे) सदाशिव दत्ता (शापोरा), ऍड. प्रकाश महादेव गोवेकर नार्वेकर (चोपडे), साहिल विजय वारंग (कामुर्ली, बार्देश), गोविंद भोबे, (नेरूल), आशय (आशु) अभय कोरडे (बोरी), संदीप एन.एस.पारकर (खांडेपार), दामोदर वसंत च्यारी (श्रीस्थळ), फा. बोलमॅक्स पेरेरा (चिखली) आणि सदानंद गावडे (प्रियोळ) यांना जाहीर झाला आहे.