जैवविविधता संवर्धन पुरस्कारासाठी नामांकने

0
229

 गोवा खबर:जैवविविधता संवर्धनाच्या क्षेत्रात आणि पर्यावरणीय टिकावाच्या दृष्टीने महत्वाचे योगदान आणि अनुकरणीय कार्यांना मान्यता देणारे गोवा राज्य जैवविविधता मंडळ (जीएसबीबी) त्यांच्या जैवविविधता संवर्धन पुरस्कारांसाठी व्यक्ती व जैवविविधता व्यवस्थापन समितीच्या वर्गवारीत नामांकन मागवित आहेत.

प्रत्येक वर्गात दोन पुरस्कार असतील. पुरस्कारासाठी नामांकन फॉर्म (जो अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे) पूर्ण असला पाहिजे आहे आणि तो गोवा राज्य जैवविविधता मंडळ, विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरण, सालीगांव सेमिनारीसमोर, सालीगांव, बार्देश, गोवा- 403511 किंवा ई-मेलः goanbiodiversity@gmail.com किंवा  goa-gsbb@gov.in येथे सादर करावा.

पुरस्कार प्राप्त झालेल्या व्यक्तींनी या पुरस्कारासाठी पुन्हा अर्ज करू नये. पुरस्कृत केलेली माहिती सिध्द करण्यासाठी पुरावे आणि प्रमाणपत्रे आवश्यक आहे ज्यांची मागणी पुरस्कार छाननी समितीद्वारे केली जाऊ शकते. जीएसबीबीद्वारे विशेष कार्यक्रमा अंतर्गत पुरस्काराचे वितरण केले जाईल.

नामांकनांसाठी 25 सप्टेंबर 2020 शेवटची तारीख असेल. अधिक माहितीसाठी जसे, निकष, पात्रता आणि निवड प्रक्रियेच्या माहितीसाठी 8767551592 यावर संपर्क साधावा. www.gsbb.goa.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.