जे पी नड्डा यांचा गोवा दौरा रद्द

0
148
गोवा खबर:भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा नियोजित गोवा दौरा रद्द झाला असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद  तानावडे यांनी दिली आहे. 
दिल्ली येथील व्यस्त कार्यक्रमांमुळे दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती  तानावडे यांनी दिली.  नड्डा उद्या सोमवारी 2 दिवसांच्या दौऱ्यावर गोव्यात येणार होते. राज्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन  तानवडे यांनी केले आहे.
यापूर्वी देखील नड्डा यांचा गोवा दौरा त्यांना कोविडची लागण झाल्याने रद्द करावा लागला होता.विधानसभा निवडणुका जवळ आल्याने नड्डा यांचा हा दौरा महत्वाचा समजला जात होता.नड्डा यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा गोवा प्रभारी सी.टी.रवी काल गोव्यात दाखल झाले होते.नड्डा यांच्या सोबत भाजपाचे राष्ट्रीय संघटन सचिव बी.एल. संतोष देखील गोव्यात येणार आहेत.