जेटलींच्या निधनाबद्दल मुख्यमंत्र्यांना दुःख

0
894

 गोवा खबर:माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा भाजप नेता अरुण जेटली यांच्या निधना बद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले दुःख,जेटली यांच्या नेतृत्वाबद्दल सगळ्यांना आदर होता,त्यांच्या अर्थमंत्री पदाच्या कार्यकाळात देशाच्या अर्थ व्यवस्थेला नवी दिशा मिळाली,त्यांच्या निधनाने देशाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे,अशा शब्दात मुख्यमंत्री प्रमोद सावंत दुःख व्यक्त केले आहे.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री नाईक आपल्या ट्वीट मध्ये,जेटली यांच्या निधनाचे वृत्त ऐकून फार दुःख झाले,जेटली हे भाजपचे महत्वपूर्ण नेते होते,गेल्या वेळच्या सरकारचा सकारात्मक प्रभाव लोकांवर पडावा यासाठी जेटली यांनी खुप कष्ट घेतले होते,त्यांच्या आत्म्यास शांती लाभो,अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.