जून महिन्याचा रेशन कोटा

0
300

गोवा खबर:जून महिन्यात अंत्योदय अन्न योजनेच्या कार्डधारकांना ३ रूपये दराने ३५ किलो तांदूळ अधिक प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेखाली प्रतिमाणसी ५ किलो तांदूळ मोफत वितरीत करण्यात येईल, १३.५० रूपये दराने १ किलो साखर वितरीत करण्यात येईल आणि एप्रिल, मे आणि जून महिन्याची ३ किलो तूरडाळ प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेखाली मोफत वितरीत करण्यात येईल.

प्राधान्यक्रम कुटुंबांना ३ रूपये दराने प्रती लाभधारक ५ किलो तांदूळ अधिक प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेखाली ५ किलो तांदूळ प्रतिलाभधारकांना मोफत वितरीत करण्यात येईल तसेच  एप्रिल, मे आणि जून महिन्याची १३.५० रूपये दराने ३ किलो साखर वितरीत करण्यात येईल. त्य़ाचप्रमाणे एप्रिल, मे आणि जून महिन्याची ३ किलो तूरडाळ प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेखाली मोफत देण्यात येईल.

एपीएल कार्डधारकांना प्रतिकार्ड १३ किलो तांदूळ १२.५० रूपये दराने आणि ४ किलो गहू १० रूपये देण्यात येईल आणि एप्रिल, मे महिन्याची २ किलो तूरडाळ ८३ रूपये दराने देण्यात येईल. अन्नपूर्णा कार्डधारकांना प्रतिकार्ड १० किलो तांदूळ मोफत देण्यात येईल आणि प्रतिकार्ड एप्रिल आणि मे महिन्याची २ किलो तुरडाळ ८३ रूपये किलो दराने देण्यात येईल.

१ जून ते २१ जूनपर्यंत धान्य वितरीत करण्यात येईल.

एप्रिल ते जूनपर्यंत एल पी जी कनेक्शन नसलेल्या कार्डधारकांना ९.५ लिटर केरोसीन १९.०६ रूपये लिटर दराने वितरीत करण्यात येईल.

प्राधान्यक्रम रेशनकार्डधारकांनी एप्रिल, मे, जून महिन्याची साखर आणि तुरडाळ कोटा उचलला नाही त्यांनी २१ जूनपर्यंत आपला कोटा उचलावा.

एपीएल आणि अन्नपूर्णा कार्डधारकांनी एप्रिल आणि मे महिन्याचा तुरडाळ कोटा उचलला नाही त्यानी आता तो २१ जूनपूर्वी उचलावा.