जुने गोवेत २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीचा राज्यस्तरीय कार्यक्रम

0
227

 

 

 

 

गोवा खबर:राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती, राज्यात ०२ ऑक्टोबर रोजी  साजरी करण्यात येणार आहे.  मुख्य राज्यस्तरीय कार्यक्रम २ ऑक्टोबररोजी सकाळी ८ वाजता, गांधी चौक, ओल्ड गोवा येथे होईल. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गांधीजींच्या स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करतील. हा कार्यक्रम, गोवा सरकारतर्फे, से ओल्ड गोवा ग्रामपंचायतीच्या सहयोगाने आयोजित केला जाणार आहे.

या कार्यक्रमाला, केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)  श्रीपाद  नाईक,  कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर, मुख्य सचिव  परिमल राय  ओल्ड गोवा ग्रामपंचायतीच्या सरपंच  जनिता  मडकईकर व इतर मान्यवर उपस्थित राहतील आणि ते महात्मा गांधीजींना यावेळी पुष्पांजली अर्पण करतील.

यावेळी कला अकादमीतील समुहातर्फे भजन सादर केले जाईल आणि ओल्ड गोवा ग्रामपंचायतीच्या समन्वयाने कला व संस्कृती संचालनालयातर्फे, भगवद्गीतेमधील, बायबलमधील व कुराणमधील श्लोकांचे पठण केले जाईल.

त्यानंतर, डॉ. सावंत इतर मान्यवरांसह, से ओल्ड गोवा ग्रामपंचायत सभागृहाकडे प्रस्थान करतील व तेथे लाल बहादूर शास्त्रीजी यांना, त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करतील.