जुगार अड्ड्यावर धाड टाकून कारवाई केलेल्या डीएसपी चौधरींचे शिवसेनेकडून अभिनंदन

0
1115
गोवाखबर:उत्तर गोवा जिल्हा पोलिस अधीक्षक चंदन चौधरी यांनी मोरजी येथील मटका अड्यावर टाकलेल्या धाडसी धाडीचे सगळ्या स्तरातील लोकांकडून स्वागत केले जात आहे.
शिवसेना महिला आघाडी प्रमुख श्रेहा धारगळकर यांनी उत्तर जिल्हा पोलीस अधीक्षक चौधरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन मोरजी येथे जुगार अड्ड्यावर केलेल्या कारवाईबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.  महिलांवर होणाऱ्या अत्याचार आणि घरेलु हिंसेला उत्तेजन देण्याचे काम जुगार करत असल्याने अशा विकृतींचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचे मत धारगळकर यांनी व्यक्त केले आहे. राजकीय दबावाला बळी न पडता अशाच प्रकारच्या कारवाया बाकी भागातही करण्याची मागणी धारगळकर यांनी चौधरी यांच्याकडे केली. सर्व पोलिस अधिकाऱ्यांनी  चौधरी यांच्या पावला पावलावर पाऊल ठेवून अशा कारवाया करून गोवा पोलिसांची हरवत चाललेली प्रतिमा परत मिळविण्याचे आवाहन केले. महिला आघाडी प्रमुख पदाची सुत्रे हाती घेताना जुगार आणि ड्रग्ज हे दोन विषय आपल्या कार्याच्या अग्रस्थानी असल्याचे सांगितले होते.