जीनो क्रीडा पुरस्कारांचे 29 रोजी वितरण

0
917

गोवा क्रीडा पत्रकार संघटना व जीनो फार्मास्युटिकल्स यांच्या सहाय्याने दरवर्षी होणाऱया ‘जीनो क्रीडा पुरस्कार 2016-17’ या सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या दि. 29 रोजी स. 11 वा हॉटेल मांडवी येथे हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. अशी माहीती जीनो  फार्मास्युटिकल्सचे संचालक दिलीप साळगांवकर यांनी दिली.

पणजीत आयोजित पत्रकार परीषदेत त्यांनी ही माहीती दिली. यावेळी त्यांच्यासोबत संघटनेचे निरज प्रभू, महेश गांवकर व मंगेश बोरकर हे उपस्थित होते.

या पुरस्कार वितरण सोहळय़ाला  प्रमुख पाहूणे म्हणून क्रीडामंत्री बाबू आजगांवकर व केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक  उपस्थित असणार आहेत असे साळगांवकर यांनी सांगितले.

सर्वोत्कृष्ट पुरुष क्रीडापटू-अनुराग म्हामल(गोव्याचा पहिला बुध्दिबळ ग्रँडमास्टर), सर्वोत्कृष्ट महिला क्रीडापटू-अनुरा प्रभुदेसाई(बॅडमिंटन), सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू-हेरंब परब(क्रिकेट), सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक-मायमोल रॉकी(भारतीय महिला संघ फुटबॉल प्रशिक्षक), सर्वोत्कृष्ट संघ-गोवा जलतरण संघ, सर्वोत्कृष्ट महाविद्यालय(पुरुष)- सेंट झेवियर महाविद्यालय, म्हापसा, सर्वोत्कृष्ट महाविद्यालय(महिला)- रोझरी महाविद्याल, नावेली यांची 2016-17च्या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.

जीनो पुरस्कारांव्यतिरिक्त नुकत्याच झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उपविजेत्या महिला संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या अष्टपैलू शिखा पांडे आणि फिझिओथेरापिस्ट ट्रसी फर्नांडिस यांचाही गौरव करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावंत युवा खेळाडूंना प्रोत्साहन देत असल्याबद्दल जीनो फार्मास्युटिकल्सचे संचालक दिलीप साळगांवकर व धेंपो उद्योग समुहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात येईल. याचबरोबर वरीष्ठ क्रीडा पत्रकार मंगेश बोरकर आणि छायापत्रकार गणादीप शेल्डेकर यांचाही सन्मान करण्यात येईल