जीटीडीसीतर्फे बुकिंग्ज.कॉमला पुरस्कार

0
889

पणजी: गोवा पर्यटन विकास महामंडळ अध्यक्ष निलेश काब्राल यांनी बुकिंग्ज.कॉमला
नुकताच ऑनलाइन ट्रॅव्हल एजंट्स विभागात सर्वोच्च कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार प्रदान केला. जीटीडीसने
आर्थिक वर्ष २०१६- १७ दरम्यान लक्षणीय विक्री नोंदवली असून ही विक्री एक कोटीपेक्षाही जास्त होती.
त्याचप्रीत्यर्थ हा पुरस्कार बुकिंग्ज.कॉमला प्रदान करण्यात आला आहे. बुकिंग्ज.कॉमच्या वतीने श्री. जेडेश
कोझिप्पली, हॉटेल्स – वरिष्ठ खाते व्यवस्थापक, भारत आणि  सिमोन पार्दीवाला, कंटेट तज्ज्ञ, भारत यांनी
हा पुरस्कार स्वीकारला
जगभरातील सर्वात मोठ्या प्रवासी ई- कॉमर्स कंपन्यांपैकी एक असलेल्या बुकिंग्ज.कॉमशी करार करणारे
जीटीडीसी हे भारतातील पहिले पर्यटन मंडळ आहे. इतक्या वर्षांत जीटीडीसी रेसिडन्सीजसाठी ऑनलाइन
आरक्षणांद्वारे भरपूर व्यवसाय मिळालेला आहे. यावर्षी ऑनलाइन आरक्षणाला विलक्षण प्रतिसाद मिळाला

असून त्यामुळे विक्री उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. २०१६ मध्ये बुकिंग्ज.कॉमने कलंगुट रेसिडेन्सीला
बुकिंग्ज.कॉमवर पाहुण्यांचा सर्वोत्तम अभिप्राय मिळवल्याबद्दल पुरस्कार दिला होता.
बुकिंग्ज.कॉमला पुरस्कार प्रदान केल्यानंतर  काब्राल म्हणाले, ‘मी जीटीडीसी आणि बुकिंग्ज.कॉमच्या संपूर्ण
टीमचे या कामगिरीबद्दल अभिनंदन करतो. बुकिंग्ज.कॉम आपल्या पर्यटकांना आवश्यक त्या सुविधा देण्यात
कायम आघाडीवर असते आणि जीटीडीसीला त्यांच्याशी भागिदारी करताना आनंद होत आहे. बुकिंग्ज.कॉमने
साध्य केलेली लक्षणीय विक्री ही उच्च ग्राहक समाधान आणि जीटीडीसी व एजन्सीने पुरवलेल्या सेवांचे फळ
आहे. बुकिंग्ज.कॉमबरोबरची ही भागिदारी दीर्घकाळ सुरू राहील आणि त्याचा गोवा व जीटीडीसीला लाब
होईल अशी आशा.’
गॅव्हिन डायस, विपणन व्यवस्थापक, जीटीडीसी आणि दीपक नार्वेकर, वरिष्ठ व्यवस्थापक आणि
जनसंपर्क अधिकारी, जीटीडीसी व इतर अधिकारी यावेळेस उपस्थित होते.