जीटीडीसीतर्फे त्रिपुरारी पौर्णिमेच्या संध्याकाळी खास सहलीचे आयोजन

0
881

पणजी: त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने विठ्ठलपूर, सांखळी येथे साजरा केला जाणारा
बोटींचा अनोखा उत्सव व परंपरा पर्यटकांना अनुभवता यावी यासाठी गोवा पर्यटन विकास
महामंडळाने एका खास सहलीचे आयोजन केले आहे.यावर्षी हा उत्सव तीन नोव्हेंबर २०१७ रोजी
साजरा केला जाणार आहे.
या उत्सवामागे एक रोमहर्षक कहाणी दडलेली असून दिवाळीचा शेवट म्हणून हा उत्सव साजरा केला जातो.
हा उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. यात उत्सवामधये पालन केल्या जाणाऱ्या परंपरेने एका
अनोख्या स्पर्धेचे रूप घेतले आहे – ते म्हणजे बोट व जहाजांच्या छोट्या प्रतिकृती बनवणे. बोटींच्या मुख्य
स्पर्धेशिवाय यादिवशी इतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामध्ये प्रसिद्ध कलाकारांचे
गायन, गोव्यातील पारंपरिक नृत्य आणि आतिषबाजी यांचा समावेश असतो.
पुण्यातील रचना क्रिएशन्स यांच्यातर्फे सा रे ग म प कार्यक्रमातील प्रसिद्ध गायक अभिषेक पटवर्धन आणि
श्रीमती मधुरा कुंभार यावेळेस ‘गाणे मनातील’ हा मराठी सांगीतिक कार्यक्रम सादर करतील.
पाहुण्यांसाठी सँटा मोनिका जेट्टी आणि म्हापसा रेसिडेन्सीपासून पिकअपची व्यवस्था करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे तपशील पुढीलप्रमाणे
संध्याकाळी ६ – भगवान कृष्णाची मिरवणूक
संध्याकाळी ७ ते ९ – विठ्ठल मंदिर, सांखळीच्या परिसरात बोटींचे प्रदर्शन
संध्याकाळी ७.३० – वळवंटी नदीत दिवे सोडणे
रात्री ८ – रचना क्रिएशन्स, पुणे यांच्यातर्फे मराठी सांगीतिक कार्यक्रम
रात्री ११ – विठ्ठल रखुमाईची पालखी मिरवणूक
रात्री ११.३० – त्रिपुरासुर – वध
रात्री ११.३५ – आकाशात ‘सारंग’ फुगा सोडणे
रात्री ११.४५ – फटाक्यांची आतिषबाजी
मध्यरात्री १२ – पारंपरिक बोटींचा उत्सव
नोंदणी कृपया संपर्क करा सँटा मोनिका जेट्टी – ०८३२-२४३८७५४ किंवा म्हापसा रेसिडेन्सी ०८३२-
२२९२६९४ किंवा भेट द्या www.goa-tourism.com