जीएचएतर्फे २०१८ साठी थरारक आणि साहसी राष्ट्रीय हिमालयीन ट्रेकिंग मोहीम जाहीर

0
959

 

गोवा हायकिंग असोसिएशनबरोबर ट्रेक करा मनालीतील निसर्गरम्य हिमालयीन गाव घोषाल इथे
घोषाल ते बियास कुंड आणि घोषाल ते भृगु तलाव यांसह दोन उच्च पातळीवरील माउंटेनियरिंग मोहीम जाहीर

पणजी: तरुण विद्यार्थी आणि तरुणांमध्ये शरीरस्वास्थ्याशी निगडीत उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी
गोवा हायकिंग असोसिएशन एप्रिल ते जून २०१८ दरम्यान घोषाल- मनाली येथे राष्ट्रीय हिमालयीन ट्रेकिंग मोहीम २०१८
आयोजन करत आहे. यामध्ये दोन उच्च पातळीवरील माउंटेनियरिंग मोहिमा आखल्या जाणार असून त्यात घोषाल ते बियास कुंड
(११,९७५ अल्टीट्यूड) आणि घोषाल ते भृगु तलाव (१४,४०० अल्टीट्यूड) यांचा समावेश आहे. त्याशिवाय गोवा हायकिंग
असोसिएशन एप्रिल ते जून २०१८ दरम्यान शालेय विद्यार्थ्यांसाठीही हिमालयामध्ये शैक्षणिक कॅम्पिंगचे आयोजन करणार आहे.
ट्रेकिंग आणि हायकिंग यांच्याकडे दोन वेगवेगळ्या दृष्टीकोनांतून पाहाता येते, एक म्हणजे तीव्र शारीरिक व्यायाम किंवा
शिकण्याचा अभूतपूर्व आणि अभिनव अनुभव. ट्रेकिंग हा एक उपक्रम आहे, जो साहसीप्रेमींच्या शारीरिक तसंच मानसिक क्षमता
आव्हान देतो. तंत्रज्ञानावर आधारित उपकरणांचा वाढता वापर आणि शहररूपी काँक्रीटच्या जंगलात राहाण्याचं प्रस्थ
वाढल्यामुळे हा ट्रेक विद्यार्थ्यांना निसर्गाच्या जवळ नेणारा ठरेल.
भारताला जगातील सर्वात मोठ्या शिखरांचे म्हणजेच माउंट एव्हरेस्ट आणि कांचनजुंगाचे वरदान लाभले आहे. गोवा हायकिंग
असोसिएशनच्या सहभागींना हिमालयातील या उत्तुंग श्रेणीवर नेऊन निसर्गाचा जबरदस्त अनुभव देण्यात आला आहे.
शक्तीशाली हिमालयात आपल्या सौंदर्याने तुमचा श्वास रोखण्याची क्षमता आहे. हिमालयीन सौंदर्याची अनुभूती तुम्हाला
स्वतःची नवी ओळख देऊन जाईल. त्याशिवाय उर्वरित जगापासून दूर असलेल्या संस्कृतीचाही तुम्हाला जवळून अनुभव घेता
येईल.
पर्वतरांगा तुम्हाला आयुष्याबद्दल बरंच काही शिकवतात. मनाली हे हिमालयातील आघाडीचे पर्यटन स्थळ असून तिथे तुम्हाला
पर्वतांमध्ये राहाण्याचा थक्क करणारा अनुभव घेता येईल. हिमालयाला भेट देण्याचा हा वर्षातील सर्वात चांगला काळ असून
ज्यांना थरारकता अनुभवत त्याच्या जवळ जायचे असेल, त्यांच्यासाठी जास्त योग्य आहे. मार्च ते जून आणि सप्टेंबर ते
नोव्हेंबरचा काळ ट्रेकसाठी चांगला असतो. खडकाळ प्रदेशातून, जवळून वाहाणाऱ्या नद्यांचे पाणी पित, बेसकॅम्पवरून बर्फाने
लपेटलेल्या हिमालयीन पर्वतांकडे पाहात ट्रेक करणं, निसर्गाचे अकृत्रिम सौंदर्य पाहाणे आणि या प्रदेशातील प्राचीन संस्कृतीची
अनुभूती घेणे हा आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय अनुभव ठरेल.
गोवा हायकिंग असोसिएशनने गोव्यातील तरुणांसाठी हायकिंग, ट्रेकिंग आणि माउंटेनियरिंग व क्लायम्बिंग उपक्रम आखण्याचे
काम हाती घेतले आहे. गेल्या ३५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या गोवा हायकिंग असोसिएशनने तरुणांमध्ये हे उपक्रम अतिशय
प्रभावीपणे रूजवले असून त्यांना यातून मानसिक व शारीरिक स्वास्थ्याच्या रुपाने फायदा होत आहे.
गोवा हायकिंग असोसिएशन ही १९७४ मध्ये स्थापन झालेली स्वयंसेवी संघटना सून तिला स्पोर्ट्स अथॉरिटी ऑप गोवाची
अधिकृतता मिळाली आहे तसेच ती भारतीय माउंटेनियरिंग फाउंडेशनशी निगडीत आहे. गोवा हायकिंग असोसिएशन तरुणांना

पुढील आयुष्यासाठी पर्यावरण जतनासंदर्भात जागरूकता निर्माण करते तसेच त्यांना झाडे- झुडुपे, वनस्पतींची माहिती देत
जंगलाचा आनंद घ्यायला शिकवते. यामधूनच त्यांना आयुष्यातील विविध परिस्थितींशी जुळवून घेत समाधानी राहायचे धडे
देते.
शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या शैक्षणिक कॅम्पिंग उपक्रमामध्ये १५ एप्रिल ते १० जून २०१८ दरम्यान सहा दिवसांच्या कॅम्पिंगचा
समावेश आहे. त्यामध्ये एक पूर्ण दिवस तज्ज्ञ शिक्षकांकडून पर्यावरण, संस्कृती व आजूबाजूच्या वातावरणाबद्दल शिकण्यासाठी
ठएवण्यात आला आहे. घोषाल ते भृगु तलाव आणि बियासकुंडापर्यंतचे ट्रेक १ ते ३० मे २०१८ दरम्यान होतील. या ट्रेकमध्ये
रॉक क्लायम्बिंग, रॅपलिंग आणि कॅम्प फायरचाही समावेश असेल.
या उपक्रमाबद्दल प्रमोद कामत, अध्यक्ष, गोवा हायकिंग असोसिएशन म्हणाले, ‘या ट्रेकमधून तरुण मुलामुलींना निसर्गाचे खरे
रूप दाखवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आम्हाला खात्री आहे, की हा अनुभव त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरेल. गोवा
हायकिंग असोसिएशन तरुण विद्यार्थ्यांना समग्र ज्ञान आणि मजेदार अनुभव देण्यासाठी तसेच सर्व उपक्रमांमध्ये त्यांची
सुरक्षितता जपण्यासाठी बांधील आहे.’
गोवा हायकिंग असोसिएशन तरुण- ट्रेकर मुलामुलींकडून लेखी अर्ज मागवणार आहे. त्यानंतर गोवा हायकिंग असोसिएशनमध्ये
विविध विभागांतील विद्यार्थ्यांची निवड प्रक्रियेतून निवड होईल.
अर्ज करण्यासाठी लिहा –
अध्यक्ष, गोवा हायकिंग असोसिएशन
महालसा प्रसाद इमारत,
जुन्या ओ हेराल्ड प्रेसजवळ
मर्सेस, गोवा ४०३००५
अधिक माहितीसाठई संपर्क
प्रमोद कामत: 9822984848
निखिल रावल: 9673701894
अधिक माहितीसाठी  संकेतस्थळाला भेट द्या : www.goahikingassociation.in.org