जिल्हा पंचायत निवडणुक 22 मार्च रोजी;आजपासून आचारसंहिता लागू

0
689
 गोवा खबर:राज्यातील उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीची घोषणा आज राज्य निवडणूक आयुक्त आर.के.श्रीवास्तव यांनी केली.22 मार्च रोजी निवडणुका होणार असून 23 मार्च रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.पक्षीय पातळीवर होणाऱ्या निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेतल्या जाणार आहेत.

पूर्वी 15 मार्च रोजी होऊ घातलेल्या निवडणुका शिमगोत्सवामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या.आता जिल्हा पंचायत निवडणुका 22 मार्च रोजी होणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले.
निवडणुकांसाठी मतदारसंघ आरक्षण जाहीर करण्यात आले असून 50 पैकी 29 जागा अनारक्षित तर 31 जागा आहेत आरक्षित करण्यात आल्या आहेत.यामध्ये 1 जागा अनुसूचित जातीसाठी,14 इतर मागासवर्गीयांसाठी,6 जागा अनुसूचित जमातीसाठी,17 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असल्याची माहिती आज राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली.
1237 मतदान केंद्रावर होणार मतदान होणारे मतदान मतपत्रिकेवर होणार आहे.23 मार्च रोजी होणार मतमोजणी, आज पासून राज्यभरात आचारसंहिता लागू झाली आहे.
इच्छुक उमेदवार 5 मार्च पर्यंत आपले उमेदवारी अर्ज सादर करू शकणार आहेत.6 मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे.7 मार्च पर्यंत मागे घेण्याची मूदत आहे.
उत्तर गोव्यत 4 लाख 18 हजार 225 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.त्यात 2 लाख 4 हजार 230 पुरुष तर 2 लाख 13 हजार 995 महिलांचा समावेश आहे.उत्तर गोव्यात 642 बुथांवर मतदान होणार आहे.
दक्षिण गोव्यात एकूण 4 लाख 11 हजार 651 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यात 2 लाख 41 पुरुष तर 2 लाख 11 हजार 610 महिला मतदारांचा समावेश आहे.
उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींच्या 50 जागांसाठी 22 मार्च रोजी 1 हजार 237 बुथांवर होणाऱ्या निवडणुकीसाठी 8 लाख 29 हजार 876 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यात 4 लाख 4 हजार 271 पुरुष तर 4 लाख 25 हजार 605 महिला मतदारांचा समावेश आहे.निवडणूक पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे.