जिल्हा पंचायत निवडणुकीत रूपेश नाईक सर्वाधिक माताधिकक्याने विजयी होतील:तानावडे

0
739
 गोवा खबर:रेईश मागुश जिल्हा पंचायत मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक रींगणात उतरलेले भाजपचे उमेदवार रूपेश नाईक सर्वाधिक माताधिक्याने निवडून येथील यात शंका नाही.कार्यकर्त्यांनी शेवटच्या आठ दिवसात जोर लावून विरोधकांची अनामत रक्कम जप्त करावी,असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी केले.
बेती येथे रूपेश नाईक यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्धाटन तानावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी मंत्री दिलीप परुळेकर,उत्तर गोवा भाजप अध्यक्ष महानंद अस्नोडकर,उमेदवार रूपेश नाईक आणि पंच सदस्य उपस्थित होते.
तानावडे म्हणाले,रूपेश नाईक यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात खुप विकास कामे करून जनतेचा विश्वास संपादन केला आहे.त्यांना दूसऱ्यांदा उमेदवारी देताना आम्हाला अजिबात विचार करावा लागला नाही.सर्व पंचायत सदस्य आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांनी काम केलेले आहे.सध्याचे चित्र पाहीले तर सर्वाधिक मतांनी निवडणूक येण्याची किमया नाईक साधू शकणार असा विश्वास तानावडे यांनी व्यक्त केला.
रूपेश नाईक म्हणाले,मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत यावेळीही रेईश मागुशवर भाजपचा झेंडा फडकेल याची खात्री वाटते.
महानंद अस्नोडकर आणि दिलीप परुळेकर यांनी देखील नाईक विजयी होतील असे सांगत कार्यकर्त्यांनी विरोधकांची अनामत रक्कम जप्त करण्यासाठी झटावे,असे आवाहन केले.