जिथे स्वच्छता तिथे परमेश्वराचा निवास असतो: आयुषमंत्री

0
753

 

 

गोवा खबर:मनात स्वच्छता असेल तर सर्वत्र परमेश्वराचे अस्तित्व दिसते. कारण जिथे स्वच्छता तिथे परमेश्वराचा निवास असतो. या ईश्वराचे अनुभूती घेण्यासाठी आपल्याला स्वच्छता राखणे फार महत्वाचे आहे. आपल्या घरापासून सुरुवात करून वाडा, आपला गाव, शहर आणि पर्यायाने देश स्वच्छ होईल. स्वच्छता म्हणजे शेवटी आपले आरोग्य होय असे प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक केले.

खासदार निधीतून आमोणा- डिचोली आणि ठाणे – सत्तरी या दोन पंचायतींना काल गुरुवारी कचरा वाहतूक वाहने प्रदान करण्यात आली. त्या वेळी श्री नाईक बोलत होते.

जनतेचे आरोग्य चांगले राखण्यासाठी लोकप्रतिनिधिनी त्याची योग्य दखल घेऊन त्याप्रमाणे सुविधा उपलब्ध करून देणे हे त्यांचे कर्तव्य आहे. खासदार निधीतून कचरा गोळा करण्यासाठी पंचायतीला वाहन प्रदान करण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे आयुषमंत्री पुढे म्हणाले.

स्वतःची स्वच्छता स्वतःच राखावी लागते. आपले आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आधी आजूबाजूची स्वच्छता राखणे गरजेचे आहे. तसेच जर सरकार किंवा एखाद्या लोकप्रतिनिधीने लोकोपयोगी वस्तू उभारली वा एखादे वाहन उपलाभा करून दिले तर त्याची व्यवस्था राखण्याचे काम हे लोकांनीच करायचे असते. ती जबाबदारी त्यांनी पार पडायला हवी असे स्थानिक आमदार आणि गोवा विधानसभेचे सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी आवाहन केले.

यावेळी अमोने पंचायतीच्या सरपंच सौ. सांगवी सागर फडते, उपसरपंच सलिया गावास, पंचा सदस्य शाबा गावास आणि काशिनाथ म्हातो हे उपस्थित होते तर ठाणे पंचायतीच्या सरपंच सौ. सरिता फटगो गांवकर यांची विशेष उपस्थिती होती.