जादुगार सुहानीचा 14, 15 रोजी ‘स्टॅण्ड अप मॅजिक’ शो

0
1113

‘स्टॅण्ड अप मॅजिक’ हा जादूचा शो मुंबई येथे प्रथम झाला असून आता गोव्यातही याचे आयोजन करण्यात आले आहे. 14 आणि  15 रोजी गोव्यात तीन ठीकाणी जादूचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी नवीन व काहीतरी वेगळे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे असे जादूगार सुहानी शाह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी सी. के. शाह उपस्थित होते.  14 रोजी कला अकादमी पणजी येथे रात्री 8.30 वा. पहिला प्रयोग होणार आहे तर  15 रोजी राजीव कला मंदिर येथे सायं. 3.30 आणि रविंद्र भवन मडगाव येथे रात्री 8.30 वा. प्रयोग होणार आहे. प्रयोगाच्या तिकिट बुकमायशो या वेबसाईटवर आणि या तिन्ही ठिकाणी उपलब्ध असणार आहेत.